गुरुचरित्र अध्याय 36 में बताया गया है कि गुरुकृपा से ही मोक्ष प्राप्ति संभव है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक राजा अपने गुरु की कृपा से मोक्ष प्राप्त करता है। राजा बहुत धार्मिक था और वह हमेशा भगवान की पूजा-अर्चना करता था। लेकिन वह मोक्ष प्राप्त करना चाहता था। उसने बहुत सारे संतों और महात्माओं से पूछा कि मोक्ष प्राप्त करने का क्या उपाय है। लेकिन कोई भी उसे संतोषजनक उत्तर नहीं दे सका।
श्रीगणेशाय नमः ॥ नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
शिष्योत्तम नामकरणी । लागे सिद्धाचिये चरणीं ।
विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावेंकरुनियां ॥ १ ॥
जय जया सिद्ध मुनि । तूंचि तारक भवार्णी ।
तूंचि होसी ब्रह्मज्ञानी । अविद्यातिमिरभास्कर ॥ २ ॥
मायामोह-रजनींत । होतों आपण निद्रिस्त ।
कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत केलें आम्हांसी ॥ ३ ॥
तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी तूं गुरु ।
कडे केला भवसागरु । चिन्मयात्मा सिद्ध मुनि ॥ ४ ॥
ऐसें म्हणोनि सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसीं ।
गुरुमूर्ति संतोषी । अभयंकार देतसे ॥ ५ ॥
पुढें चरित्र केवीं झाले । विस्तारावें स्वामी वहिलें ।
आमुतें स्वामी कृतार्थ केलें । ज्ञानामृत प्राशवूनि ॥ ६ ॥
कथामृत ऐकतां श्रवणीं । तृप्ति न होय अंतःकरणीं ।
निरोपावें विस्तारोनि । म्हणोनि चरणीं लागला ॥ ७ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढील कथा असे निका ।
एकचित्तें तुम्हीं ऐका । ज्ञान होय समस्तांसी ॥ ८ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा वाढला अपरांपरु ।
बोलतां असे विस्तारु । तावन्मात्र सांगतसों ॥ ९ ॥
महिमा एकेक सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
अवतार श्रीहरि साक्षाता । कवण शके वर्णावया ॥ १० ॥
तया गाणगापुरांत । होता विप्र वेदरत ।
विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गें वर्ततसे ॥ ११ ॥
नेघें प्रतिग्रहो म्हणे । परान्नासी जावों नेणे ।
मिथ्यावाद मृषा भाषण । अतिवादे आपण न करीच ॥ १२ ॥
नित्य शुष्क भिक्षा करी । तेणें आपण उदर भरी ।
तयासी असे एक नारी । क्रोधवंती परियेसा ॥ १३ ॥
याचकवृत्ति तो ब्राह्मण । करी संसार सामान्यपणें ।
अतीत-अभ्यागताविणें । अन्न नेघे प्रत्यहीं ॥ १४ ॥
तया ग्रामीं प्रतिदिवसीं । विप्र येती आराधनेसी ।
सहस्र संख्या ब्राह्मणांसी । मिष्टान्न घालिती परियेसा ॥ १५ ॥
तया ग्रामी विप्रवनिता । समस्त जाती भोजनाकरितां ।
येऊनि सदनी स्तवित । अनेकपरीचीं पक्वान्नें ॥ १६ ॥
ऐकोनि ते विप्रनारी । नानापरी दुःख करी ।
परमेश्र्वरा श्रीहरी । म्हणोनि चिंती मनांत ॥ १७ ॥
कैसें दैव आपुलें हीन । नेणें स्वप्नीं ऐसें अन्न ।
दरिद्री पतीसी वरुन । सदा कष्ट भोगीतसें ॥ १८ ॥
पूर्वजन्मींचें आराधन । तैसा आपणासी पति हीन ।
सदा पाहें दरिद्रपणें । वर्ततसे देवराया ॥ १९ ॥
समस्त विप्र स्रियांसहित । नित्य परान्नभोजन करीत ।
पूर्वजन्मींचे सुकृत । केलें होतें सकळिकीं ॥ २० ॥
आपुला पति दैवहीन । कधीं नवचे परान्ना ।
काय करावें नारायणा । म्हणोनि चिंती मनांत ॥ २१ ॥
वर्ततां ऐसें तया स्थानीं । आला विप्र महाधनी ।
अपरपक्ष करणें मनीं । म्हणोनि आला परियेसा ॥ २२ ॥
तया स्थानीं विप्रांसी । क्षण दिले परियेसीं ।
सवें त्यांच्या स्रियांसी । आवंतिले परियेसा ॥ २३ ॥
देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी आली त्वरिता ।
सांगती झाली विस्तारता । आमंत्रण ब्राह्मणाचें ॥ २४ ॥
अनेकपरीचीं पक्वान्नें । देती वस्त्रें-परिधानें ।
अपार द्रव्य दक्षिणे । देताति ऐके प्राणेश्र्वरा ॥ २५ ॥
यातें स्वामी अंगीकारणें । अथवा आपणा निरोप देणें ।
कांक्षा करितें माझें मन । मिष्टान्न अपूर्व जेवावें ॥ २६ ॥
ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत ब्राह्मण ।
सुखें जावें करीं भोजन । आपणा न घडे म्हणतसे ॥ २७ ॥
निरोप घेऊनि तये वेळीं । गेली तया गृहस्थाजवळी ।
आपण येऊं भोजनकाळीं । म्हणोनि पुसे तयासी ॥ २८ ॥
विप्र म्हणे तियेसी । आम्ही सांगूं दंपतीसी ।
बोलावीं आपुल्या पतीसी । तरीच आपुल्या गृहा यावें ॥ २९ ॥
ऐकोनि तयाचें वचन । झाली नारी खेदें खिन्न ।
विचार करी आपुले मनीं । काय करणें म्हणोनियां ॥ ३० ॥
आतां काय करावें म्हणे । कैसें दैव आपुलें उणे ।
बरवें अन्न स्वप्नीं नेणें । पतीकरितां आपणासी ॥ ३१ ॥
विचार करुनि मानसीं । आली नृसिंहगुरुपाशीं ।
नमन करी साष्टांगेसीं । अनेकपरी विनवीत ॥ ३२ ॥
म्हणे स्वामी एक करणें । बरवें अन्न कधीं नेणें ।
आपुल्या पतीसी सांगणें । आमंत्रणा जावें म्हणोनि ॥ ३३ ॥
सांगूं म्हणती दंपतीसी । माझा पति नायके वचनासी ।
न वचे कधीं परान्नासी । काय करुं म्हणतसे ॥ ३४ ॥
स्वामी आतां कृपा करणें । माझ्या पतीतें सांगणें ।
बरवीं येताति आमंत्रणें । अन्नवस्त्र देताति ॥ ३५ ॥
ऐकोनि तियेचे वचन । श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
बोलावूनियां तत्क्षण । सांगती तया द्विजासी ॥ ३६ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावें तुवां आमंत्रणेसी ।
तुझे स्त्रियेचे मानसीं । असे मिष्टान्न जेवावें ॥ ३७ ॥
तिचे मनींची वासना । तुवां पुरवावी कारणा ।
सदा दुश्र्चित अंतःकरण । कुलस्त्रियेचें असूं नये ॥ ३८ ॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । नमन करी तो ब्राह्मण ।
विनवीतसे कर जोडून । नेघें परान्न नेम असे ॥ ३९ ॥
गुरुवचन जों न करी । तो पडे रौरवघोरीं ।
निरोप तुमचा माझ्या शिरीं । जाईन स्वामी म्हणतसे ॥ ४० ॥
पुसोनिया श्रीगुरुसी । आलें दंपत्य आमंत्रणासी ।
आनंद झाला बहुवसी । तया विप्रस्त्रियेंतें ॥ ४१ ॥
पितृनाम उच्चारोन । संकल्प करी तो ब्राह्मण ।
अनेकपरीचें मिष्टान्न । वाढिती तया दंपतींसी ॥ ४२ ॥
भोजन करित्या समयासी । दिसे विपरीत तियेसी ।
श्र्वान-सूकर येऊनि हर्षी । समागमें जेविताति ॥ ४३ ॥
कंटाळले तिचें मन । उठे आपण त्यजूनि अन्न ।
जेवीत होते जे ब्राह्मण । त्यां समस्तांसी सांगतसे ॥ ४४ ॥
ऐेसेपरी पतीसहित । आली नारी चिंता करीत ।
पतीस सांगे वृत्तांत । श्र्वानउच्छिष्ट जेविलेति ॥ ४५ ॥
स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण । तुझेनि आपुलें दैव हीन ।
घडलें आपणा परान्न । उच्छिष्ट श्र्वानसूकरांचे ॥ ४६ ॥
ऐसें कोपोनि स्त्रियेसी । आली दोघें श्रीगुरुपाशीं ।
नमन करी भक्तीसीं । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ४७ ॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसें सुख परान्नासी ।
सदा दूषिसी पतीसी । पुरले तुझे मनोरथ ॥ ४८ ॥
ऐसें वचन ऐकोनि । लागे नारी श्रीगुरुचरणीं ।
विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणें स्वामिया ॥ ४९ ॥
मंदमति आपणासी । दोष घडविले पतीसी ।
नेलें आपण परान्नासी । क्षमा करणें स्वामिया ॥ ५० ॥
चिंता करी द्विजवरु । म्हणे स्वामी काय करुं ।
दोष घडला अपारु । व्रतभंग झाला म्हणोनि ॥ ५१ ॥
परान्न न घ्यावें म्हणोनि । संकल्प होता माझे मनी ।
मिळाली सती वैरिणी । दोष आपणा घडविले ॥ ५२ ॥
ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती हांसोन ।
पुरविली स्त्रियेची वासना । आतां तिचें मन धालें ॥ ५३ ॥
कधीं नवचे परान्नासी । वर्तेल तुझ्या वाक्यासरसीं ।
न करीं चिंता मानसीं । दोष तुज नाहीं जाण ॥ ५४ ॥
आणिक एक सांगेन तुज । जेणें धर्म घडती सहज ।
अडला असेल एखादा द्विज । दैवपितृकर्माविणें ॥ ५५ ॥
कोणी न मिळे विप्र त्यासी । जावें तेथें भोजनासी ।
जरी तेथें तूं न वचसी । अनंत दोष असे जाण ॥ ५६ ॥
श्रीगुरुचें वचन ऐकोन । विप्र सांष्टांगी करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । विनंति माझी परियेसा ॥ ५७ ॥
अन्न घ्यावें कवणाचे घरीं । घडती दोष कवण्यापरी ।
जाऊं नये कवण्या द्वारीं । निरोपावें स्वामिया ॥ ५८ ॥
विप्रवचन ऐकोनि । श्रीगुरु सांगती विस्तारोनि ।
एकचित्त करुनि । ऐका श्रोते सकळिक ॥ ५९ ॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न घ्यावयाची घरें पुससी ।
गुरुभुवनादिकीं हर्षीं । जेवावें शिष्यवर्गा-घरीं ॥ ६० ॥
वैदिकादि विद्वज्जन । मातुल अपुला श्र्वशुर जाण ।
सहोदरादि साधुजन–। गृहीं अन्न जेवावें ॥ ६१ ॥
अडला विप्र ब्राह्मणावीण । त्याचे घरी घ्यावें अन्न ।
करावें गायत्रीजपन । दोष नाहीं अवधारा ॥ ६२ ॥
विप्र म्हणे श्रीगुरुसी । विनंती माझी परियेसीं ।
निषिद्ध अन्न सांगा आम्हांसी । कवण्या घरीं जेवूं नये ॥ ६३ ॥
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी । अन्नवर्जित घरें पुससी ।
अपार असे स्मृतिचंद्रेकेसी । क्रमेंकरुनि सांगेन ॥ ६४ ॥
नित्य मातापितयांशी । सेवा घेती अतिदोषी ।
जेवूं नये त्या सदनासी । धनलोभिष्ट द्विजांघरी ॥ ६५ ॥
कलत्र-पुत्र कष्टवोनि । धर्म करी ब्राह्मणजनीं ।
अन्न निषिद्ध तया भुवनीं । दोष घडती जेवलिया ॥ ६६ ॥
गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी । विप्र होवोनि मल्लयुद्ध करी ।
वीणा-विद्या ज्याचे घरीं । न घ्यावें अन्न ब्राह्मणानें ॥ ६७ ॥
बहिष्कारी विप्राघरीं । याचकवृत्तीं उदर भरी ।
अन्न वर्जावें तया घरीं । आत्मस्तुति-परनिंदका ॥ ६८ ॥
बहुजन एक अन्न करिती । पृथक् वैश्र्वदेव न करिती ।
वर्जावें अन्न विप्रजातीं । महादोष बोलिजे ॥ ६९ ॥
गुरु होऊनि समस्तांसी । आपं मंत्र उपदेशी ।
शिष्य राहटे दुर्वृत्तीसीं । त्या गुरुघरी जेवूं नये ॥ ७० ॥
क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावें गृहीं ऐसे ।
स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे । जेवूं नये तया घरीं ॥ ७१ ॥
धनगर्वी तामसाघरीं । कृपण निर्दय व्यभिचारी ।
दांभिक दुराचारी विप्राघरीं । अन्न तुम्हीं वर्जावें ॥ ७२ ॥
पुत्र-पतीतें सोडोनि । वेगळी असे जे ब्राह्मणी ।
वर्जावें अन्न साधुजनीं । महादोष बोलिजे ॥ ७३ ॥
स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र सुवर्णाकार करी ।
बहुयाजक निरंतरी । तया घरीं न जेवावें ॥ ७४ ॥
खळ-राजसेवकाघरीं । लोहकारसूचिका घरीं ।
वस्त्रधूत-रजकाघरीं । दान न घ्यावें ब्राह्मणें ॥ ७५ ॥
मद्य करी त्या नराघरीं । याचूनियां संचित करी ।
वेश्मीं सहजार असे नारी । दान विप्रें न घ्यावें ॥ ७६ ॥
तस्करविद्या असे ज्यासी । द्वारपाळघरा परियेसीं ।
न घ्यावें अन्न कुलालासी । महादोष बोलिजे ॥ ७७ ॥
द्रव्य घेऊनि शूद्राकरीं । अध्ययन सांगे द्विजवरी ।
अन्न वर्जावें तया घरी । घोडीं विकी जो ब्राह्मण ॥ ७८ ॥
भगवत्कीर्तन नाहीं घरीं । द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी ।
स्नानावीण भोजन करीं । तया घरीं जेवूं नये ॥ ७९ ॥
न करी संध्या संधिकाळीं । दान न करी कवणे वेळीं ।
पितृकर्मवर्जित कुळीं । तया घरीं न जेवावें ॥ ८० ॥
दंभार्थानें जप करी । अथवा काम्यरुपें जरी ।
द्रव्य घेवोनि जप करी । तया घरीं जेवूं नये ॥ ८१ ॥
ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी परियेसीं ।
द्रव्य संचीत कळंतरेसीं । तया घरी जेवूं नये ॥ ८२ ॥
विश्र्वासघातकी नराघरीं । अनीति पक्षपात करी ।
स्वधर्म सांडी दुराचारी । पूर्वजमार्ग सोडिलिया ॥ ८३ ॥
द्विजोत्तम-साधूसी । एखादा करी द्वेषासी ।
अन्न वर्जावें तुम्हीं हरुषीं । ऐक ब्राह्मणा एकचित्तें ॥ ८४ ॥
कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय जो परता ।
आपल्या गुरुसी निंदिता । जेवूं नये तया घरीं ॥ ८५ ॥
गोब्राह्मणवधका घरीं । स्त्रीवधू नर असे जरी ।
अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ८६ ॥
आशाबद्ध असे नर । करुनि धरी एकाचें द्वार ।
दान देता वर्जी नर । तया घरी जेवूं नये ॥ ८७ ॥
समस्त यातींस शरण । तोचि चांडाळ होय जाण ।
घेऊं नये त्याचें अन्न । नमन न करी ब्राह्मणासी ॥ ८८ ॥
आपुल्या कन्याजामातासी । क्रोधेंकरुन सदा दूषी ।
न घ्यावें अन्न त्या घरासी । निपुत्राचे घरीं देखा ॥ ८९ ॥
विवाह झाला असतां आपण । पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण ।
‘ परपाकनिवृत्त ‘ नाम जाण । जेवूं नये तया घरी ॥ ९० ॥
यज्ञ पंचमहा करी आपण । जेवी आणिकाचे घरीं अन्न ।
‘ परपाकरत ‘ नर नाम जाण । तया घरीं जेवूं नये ॥ ९१ ॥
गृहस्थधर्में असे आपण । दान धर्म न करीं जाण ।
‘ अपच ‘ नाम तया जाण । जेवूं नये तया घरीं ॥ ९२ ॥
घरींचे अन्न दूषण करी । परान्नाची स्तुति अपारी ।
अन्न घेतां त्याच्या घरीं । अंधक होय अल्पायुषी ॥ ९३ ॥
बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेधा जाय जाण ।
धृतिशक्ति होय हीन । भाणवसा घरीं जेवूं नये ॥ ९४ ॥
परगृही वसे आपण । परान्न जेवी जो ब्राह्मण ।
त्याचें जितुकें असे पुण्य । यजमानासी जाय देखा ॥ ९५ ॥
तया यजमानाचे दोष । लागती त्वरित भोजनस्पर्शें ।
याचिकारणें निषेध असे । परान्न तुम्हीं वर्जावें ॥ ९६ ॥
भूमिदान सुवर्णदान । गज-वाजी-रत्नदान ।
घेतां नाहीं महादूषण । अन्न घेतां अतिदोष ॥ ९७ ॥
समस्त दुष्कृतें परान्नासी । घडती देखा ब्राह्मणासी ।
तैसेंचि जाणा परस्त्रियेसी । संग केलिया नरक होय ॥ ९८ ॥
परगृहीं वास करितां । जाय आपुली लक्ष्मी त्वरिता ।
अमावास्येसी परान्न जेवितां । मासपुण्य जाय देखा ॥ ९९ ॥
अगत्य जाणें परान्नासी । न बोलवितां जाय सांजेसी ।
जातां होती महादोषी । शूद्रें बोलावितां जाऊं नये ॥ १०० ॥
आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊं नये भोजनासी ।
पुत्र झालिया कन्येसी । सुखें जावें अवधारा ॥ १०१ ॥
सूर्यचंद्रग्रहणासी । अन्न घेऊं नये परियेसीं ।
जात अथवा मृतसतकेसी । जेवूं नये परियेसा ॥ १०२ ॥
ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे द्विजवर ।
तैसें जरी करिती नर । त्यांसी कैंचे दैन्य असे ॥ १०३ ॥
समस्त देव त्याचे हातीं । अष्ट महासिद्धि साधती ।
ब्राह्मणकर्में आचरती । कामधेनु तया घरीं ॥ १०४ ॥
विप्र मदें व्यापिलें । आचारकर्में सांडिलें ।
याचिकारणे दरिद्री झाले । स्वधर्मनष्ट होऊनि ॥ १०५ ॥
विप्र विनवी स्वामीसी । आमुची विनंति परियेसीं ।
आचारधर्म कैसी । निरोपावे दातारा ॥ १०६ ॥
गुरुमूर्ति कृपसागरु । त्रिमूर्तीचा अवतारु ।
भक्तजनांचा तूं आधारु । निरोपावे आचार स्वामिया ॥ १०७ ॥
श्रीगुरु म्हणती तयासी । ब्राह्मणाचा आचार पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेसीं । पूर्वी ऋषि आचरले जो ॥ १०८ ॥
नैमिषारण्यीं समस्त ऋषि । तप करिती बहुवसी ।
आला तेथें पराशर ऋषि । म्हणोनि समस्त वंदिती ॥ १०९ ॥
समस्त ऋषि मिळोन । विनविताति कर जोडून ।
ब्राह्मणपणाचें आचरण । केवीं करावें म्हणोनि ॥ ११० ॥
आचार आम्ही आतां करीत । तेणें संशय मनीं होत ।
ब्रह्मऋषि तूं विख्यात । तुझा उपदेश आम्हां व्हावा ॥ १११ ॥
गुरुमुखाविणें मंत्र । ग्राह्य नव्हे, तो अपवित्र ।
आम्हां गुरु तूं पवित्र । आचार सर्व सांगावा ॥ ११२ ॥
पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन आचार परियेसीं ।
जेणें होय अप्रयासीं । सर्व सिद्धिपावती ॥ ११३ ॥
ब्राह्ममुहूर्ती उठोनि । श्रीगुरुस्मरण करोनि ।
मग ध्याव्या मूर्ती तिन्ही । ब्रह्मा-विष्णु-महेश्र्वर ॥ ११४ ॥
मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन सह । सनातन स्मरावे तये वेळीं ॥ ११५ ॥
सह नारद तुंबरु देखा । स्मरावे सिद्ध योगी ऐका ।
सप्त समुद्र असती देखा । स्मरावें सप्त पर्वतां ॥ ११६ ॥
सप्त ऋषींतें स्मरोनि । सप्त द्वीपें सप्त भुवनीं ।
समस्त नामकरणें घेऊनि । मग म्हणावें ” प्रातःस्मरामि ” ॥ ११७ ॥
मग उठावें शयनस्थानीं । आचमन करोनि दोनी ।
मूत्रशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावें ॥ ११८ ॥
पराशर म्हणे ऋषींसी । ऐका आचमन तुम्हांसी ।
सांगतसें विस्तारेसीं । जे जे समयीं करणें असे ॥ ११९ ॥
स्नानपूर्व अपर दोनी । उदक पितां येणेंचि गुणीं ।
निजतां उठतां समयीं दोनी । आचमनें करावी ॥ १२० ॥
भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई आलिया, शिंकलिया दोनी ।
लघुशंका शौचीं दोनी । आचमन करावें ॥ १२१ ॥
अघोवायुशब्द झालिया । वोखटें कांहीं दृष्टीं देखिलिया ।
दोन्ही वेळां आचमनूनियां । शुचि होय परियेसा ॥ १२२ ॥
जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन करा निर्धारीं ।
स्पर्शावें चक्षु श्रोत्रीं । येणें पवित्र परियेसा ॥ १२३ ॥
ब्राह्मणाचे उजवे कानीं । सप्त देवता असती निर्गुणी ।
त्यांसी स्पर्शितां तत्क्षणीं । आचमनफळ असे देखा ॥ १२४ ॥
(श्र्लोक) अर्ग्निरापश्र्च वेदाश्र्च वरुणार्केदुवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे । नित्यं तिष्ठंति देवताः ॥१२५ ॥
(टिका) त्या देवतांचीं नावें ऐका । सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु वेद चंद्र असती ॥ १२६ ॥
लघुशंकाऽचमन करोनी । तूष्णीं स्नान सुमनीं ।
बैसावे शुचि-आसनीं । अरुणोदय होय तंव ॥ १२७ ॥
गायत्रीजपाव्यतिरिक्त । वरकड जपावें आगमोक्त ।
मग होतां अरुणोदित । बहिर्भूमीसी जाइजे ॥ १२८ ॥
यज्ञोपवीत कानीं ठेवोनि । नैऋत्य दिशे जाऊनि ।
डोई पालव घेवोनि । अधोमुखीं बैसावें ॥ १२९ ॥
दिवसा बैसावें उत्तरमुखी । रात्रीं बैसावें दक्षिणमुखी ।
मौन असावें अति विवेकीं । चहूंकडे पाहूं नये ॥ १३० ॥
सूर्तचंद्रनक्षत्रांसी । पाहूं नये नदी आकाशीं ।
स्त्रीजन लोक परियेसीं । पाहूं नये कवणातें ॥ १३१ ॥
जो ब्राह्मण उभा मुती । त्याची ऐका कवण गति ।
त्याचे अंगीं रोम किती । तितुके दिवस नरकीं पडे ॥ १३२ ॥
शोचाविणें कांस घाली जरी । कांस न सोडितां लघुशंका करी ।
त्यासी होय यमपुरी । नरक भोगी अवधारा ॥ १३३ ॥
अगत्य घडे उदकावीण । करुनियां गंगास्मरण ।
मृत्तिकेनें शौच करणें । भक्षणादि वर्जावें ॥ १३४ ॥
बहिर्भूमि बैसावयासी । ठाव कैसा परियेसीं ।
ऐका तत्पर सर्व ऋषी । म्हणे पराशर ऋषेश्र्वर ॥ १३५ ॥
न बैसावें भूमीवरी । बैसिजे पानगवतावरी ।
हिरवें पान करावें दूरी । वाळल्या पर्णी बैसावें ॥ १३६ ॥
मलविसर्जन करुनि । उठावें ऐका ब्रह्मा धरुनि ।
जळपात्रापाशीं जाऊनि । शौच करावें परियेसा ॥ १३७ ॥
मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका नाणावी तुम्हीं ऐशी ।
वारुळ मूषकगृह परियेसीं । नदीमधील आणूं नये ॥ १३८ ॥
ज्या मार्गी लोक चालती । अथवा वृक्षाखालील माती ।
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका आपण वर्जावी ॥ १३९ ॥
वापी-कूप-तडागांत । मृत्तिका आणिता पुण्य बहुत ।
उदक करीं घेऊनि प्रोक्षित । मृत्तिका घ्वावी शौचासी ॥ १४० ॥
आंवळ्याएवढे गोळे करावे । लिंगस्थानीं एक लावावें ।
अपानद्वारीं पांच स्वभावें । एकैक हस्तासी तीन सप्त ॥ १४१ ॥
एकैक पायासी सात गोळीं । मृत्तिका लावावी सकळीं ।
आणिक सांगेन समय काळीं । ऋषि समस्त परियेसा ॥ १४२ ॥
मृत्तिका शौचविधान । मूत्रशंकेसी एक गुण ।
बहिर्भूमीसी द्विगुण । मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥ १४३ ॥
मृत्तिकाशौच करावें । तोंवरी मौन आसावें ।
कोणीकडे न पहावें । नेम करावा येणेंपरी ॥ १४४ ॥
आणिक प्रकार असे एक । करावया नेम प्रमाणिक ।
जितुकें करी गृहस्थ देख । द्विगुण करावें ब्रह्मचारीं ॥ १४५ ॥
त्रिगुण करावें वानप्रस्थें । चतुर्गुण यतीं समस्तें ।
न्यूनाधिक न करा परतें । धर्मसिद्धि होय देखा ॥ १४६ ॥
येणें प्रकारें करा दिवसीं । रात्रीं याच्या अर्धेंसीं ।
संकटसमयीं तदर्धेंसीं । मार्गस्थ अर्ध त्याहुनी ॥ १४७ ॥
व्रतबंध झालिया ब्राह्मणास । हेचि आचार परियेस ।
चारी वर्णा हाचि उपदेश । शौचविधि बोलिला ॥ १४८ ॥
शौच केलियाउपरी । चूळ भरावे परिकरी ।
ब्राह्मण आठ वेळां भरी । क्षत्री सहा परियेसा ॥ १४९ ॥
वैश्य चार, शूद्र दोन वेळां । येणेंविधि भरा चुळा ।
समस्त ऐका ऋषिकुळा । म्हणे पराशर ऋषि ॥ १५० ॥
चूळ भरावें आठ वेळां । आचम्यावें तीन वेळां ।
शुद्धस्थानीं बैसून निर्मळा । कुळदैवत स्मरावें ॥ १५१ ॥
तूष्णीं आचमन करावें । नाम न घेतां वीस ठाव आतळावे ।
पुनः आचमन करावें । त्याचें विधान सांगेन ॥ १५२ ॥
विप्रदक्षिणतळहातीं । पांच तीर्थें विख्या असती ।
जें बोलिली असे स्मृति । तेंही आतां सांगेन ॥ १५३ ॥
अंगुष्ठमूळ-तळहातेसीं । ‘ ब्राह्मतीर्थ ‘ ‘अग्नितीर्थ ‘ परियेसीं ।
अंगुष्ठतर्जनी-मध्यदेशीं । ‘ पितृतीर्थ ‘ असे जाण ॥ १५४ ॥
चतुरंगतळवेवरी । ‘ देवतीर्थ ‘ असे निर्धारीं ।
कनिष्ठिकामागोत्तरीं । ‘ ऋषितीर्थ ‘ असे जाणा ॥ १५५ ॥
तर्पण देव-पितृ-ऋषि । जे ते स्थानतीर्थे करा हर्षी ।
आचमन ब्राह्मतीर्थेंसीं । करावें ब्रह्मविद्वजनें ॥ १५६ ॥
ब्राह्मतीर्थें आचमनें तीनी । ‘ केशव-नारायण-माधव म्हणोनि ।
देवतीर्थें उदक सोडोनि । ‘ गोविंद ‘ नाम उच्चारावें ॥ १५७ ॥
‘ विष्णु-मधुसूदन ‘ हस्त धुवोनि दोनी । ‘ त्रिविक्रम-वामन ‘ गाल स्पर्शोनि ।
बिंबोष्ठीं तळहस्त ठेवोनि । ‘ श्रीधर ‘ नाम ऊच्चारावें ॥ १५८ ॥
पुनरपि हस्त ‘ हृषीकेशी ‘ । ‘ पद्मनाभें ‘ पादस्पर्शी ।
सव्य हस्त पंचागुंलीसीं । ‘ दामोदरें ‘ शिरस्थानीं ॥ १५९ ॥
चतुरंगगुलपृष्ठेसीं । ‘ संकर्षण ‘ घ्राणेसी ‘ ।
तर्जनी-आदि अंगुष्ठेसीं । म्हणावा ‘ वासुदेव प्रद्युम्न ‘ ॥ १६० ॥
अंगुष्ठानामिकें ‘ अनिरुद्ध-पुरुषोत्तम ‘ नेत्रांसी । श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठकनिष्ठिकेसीं ।
‘ अधोक्षज-नारसिंह ‘ म्हणा ऐसी । ‘ अच्युतें ‘ नाभि, ‘ जनार्दनें ‘ हृदयस्पर्श ॥ १६१ ॥
पंचांगुलीं ‘ उपेन्द्र ‘ शिरसीं देखा । ‘ हरि-श्रीकृष्णें ‘ भुजांस ऐका ।
पांच-अंगुलीं विधिपूर्वका । येणेंविधि स्पर्शावें ॥ १६२ ॥
येणेंविधि संध्याकाळीं ।आणिक करावें वेळोवेळीं ।
अशक्य अथवा संकटकाळीं । आहेति विधानें तीं ऐका ॥ १६३ ॥
ब्राह्मतीर्थें तीन वेळां घ्यावें । हस्त प्रक्षाळा गोविंद-नांवें ।
मुख स्पर्शोनि मंत्र म्हणावे । संध्याव्यतिरिक्त येणेंविधि ॥ १६४ ॥
विधान आणिक सांगेन । देवतीर्थे उदक घेऊन ।
गोविंदनामें हस्त धुऊन । चक्षुःश्रोत्र स्पर्शावे ॥ १६५ ॥
शूद्रादि ओवळियासी । स्पर्श होतां परियेसीं ।
आचमन करा ऐसी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ १६६ ॥
भिजोनि आलिया पाउसांत । द्विराचमनें होय पुनीत ।
स्नान-भोजनांतीं निश्र्चित । द्विराचमन करावें ॥ १६७ ॥
फळाहार भक्षण करितां । अथवा आपण उदक घेतां ।
आला असेल स्मशान हिंडतां । द्विराचमनें शुद्ध होय ॥ १६८ ॥
आणिक असे एक परी । तूष्णीं आचमन करा निर्धारी ।
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन करावें ॥ १६९ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसीं । दैन्य कैंचें तया घरीं ॥ १७० ॥
आतां सांगेन विधान । करावयासी दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा षष्ठी वर्जावी ॥ १७१ ॥
न करावें नवमीद्वादशीसी । शनि-अर्क-मंगळवारेसीं ।
श्राद्धकाळीं विवाहदिवसीं । करुं नये दंतधावन ॥ १७२ ॥
कंटकवृक्षशाखेसीं । ताड-हिंताड-केतकीसीं ।
खर्जूर-नारिकेळ-शाखेसीं । केलिया जन्म चांडाळयोनीं ॥ १७३ ॥
खदिर-करंज-आघाडेसीं । औदुंबर अर्क वट परियेसीं ।
अथवा वृक्ष करवंदेसीं । पुण्य वृक्ष असे ऐका ॥ १७४ ॥
विप्रा द्वादशांगुळेसीं । नवांगुळें क्षत्रियासी ।
षडांगुळें वैश्यशूद्रांसी । दंतधावन-काष्ट आणावें ॥ १७५ ॥
दंतधावन-काष्टेसी । तोडितां म्हणावें मंत्रासी ।
‘ आयुःप्रजा ‘ नाम परियेसीं । म्हणोनि काष्ट तोडावें ॥ १७६ ॥
दंतधावन करोनि ऐसें । काष्ट टाकावें नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावें ॥ १७७ ॥
मग करावें प्रातःस्नान । तेणे होय सर्व साधन ।
तेजोबलआयुष्यवर्धन । प्रातःस्नान केलिया ॥ १७८ ॥
प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ दैवत आपणा वश ।
सौभाग्य सुख पुष्टि हर्ष । दरिद्र-चिंता-शोकहरण ॥ १७९ ॥
नित्य केलिया पापनाश । करावें याचि कारणें हर्षें ।
गृहस्थ-वानप्रस्थें विशेंषें । प्रातर्मध्यान्हीं करावें ॥ १८० ॥
यतीं तापसीं संन्यासी । त्रिकाळ करावें परियेसीं ।
ब्रह्मचारीं विधिसीं । एकवेळ करावें ॥ १८१ ॥
अशक्य संकट जाहलें जरी । अथवा न मिळे निर्मळ वारी ।
स्नान करावयाची परी । सांगेन ऐक ब्राह्मणा ॥ १८२ ॥
अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावें वायुस्नान ।
मंत्रस्नान करावें विधीनें । ‘ आपोहिष्ठा ‘ मंत्रेसीं ॥ १८३ ॥
आणिक स्नानफळें असती । ज्यासी असेल भावभक्ति ।
गुरुदेवता-दर्शनमात्रीं । तीर्थस्नानफळ असे ॥ १८४ ॥
अथवा दर्शन-मातापिता । चरणतीर्थ भक्तीनें घेतां ।
अंगावरी प्रोक्षितां । तीर्थस्नानफळ असे देखा ॥ १८५ ॥
अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावें गोधुळींत । स्नानफळ असे देखा ॥ १८६ ॥
स्पर्श होतां चांडाळाचा । जलस्नानें होय शुचा ।
स्पर्श होतां शूद्राचा । उपस्नान करावें ॥ १८७ ॥
दृढ असतां देह आपुलें । स्नान मुख्य करावें जलें ।
संधि-विग्रह-सांकडे मांडले । उपस्नान करावें ॥ १८८ ॥
प्रातःस्नान करावयासी । शीतोदक उत्तम परियेसीं ।
अशक्य असेल देहासी । उष्णोदकें करावें ॥ १८९ ॥
स्वभावें पवित्र असे उदक । वरी झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झालें उदक अधिक । गृहस्थासी मुख्य असे ॥ १९० ॥
उष्णोदकें स्नान करितां । शीतोदक करा मिश्रिता ।
मध्यें करावें आचमन तत्त्वतां । संकल्प तेथें न म्हणावा ॥ १९१ ॥
घरीं स्नान करितां देखा । अघमर्षण तर्पण नव्हे निका ।
वस्त्र पिळूं नये ऐका । आपुले हस्तेंकरुनियां ॥ १९२ ॥
पुत्रोत्साहीं संक्रांतीसी । श्राद्धकाळीं मृतदिवसीं ।
न करावें स्नान उष्णोदकेसीं । पौर्णिमा-अमावास्येसी ॥ १९३ ॥
स्नान करितां बांधा शिखा । दर्भहातीं सूर्याभिमुखा ।
मौन स्नान असे मुख्या । कवणासवें न बोलावें ॥ १९४ ॥
‘ अपोहिष्ठेति ‘ मंत्रेसीं । गायत्री तीन म्हणा सुरसी ।
येणें मंत्रे स्नानोदकासी । अभिमंत्रावें ब्राह्मणें ॥ १९५ ॥
प्रथम शीतोदक घालूनि । पश्र्चात् उष्णोदक मिळवोनि ।
स्नान करावें प्रतिदिनीं । गृहस्थाश्रमीं घरीं देखा ॥ १९६ ॥
आचमन करुनि आपण । ‘ देवस्यत्वा ‘ मंत्र जपोन ।
धूत वस्त्र घेऊन । आणिक मंत्र जपावे ॥ १९७ ॥
‘ अवधूत ‘ मंत्र म्हणत । वस्त्र उकलावें त्वरित ।
‘ उदुत्यं- ‘ मंत्र म्हणत । वस्त्र सूर्यासी दाखवावें ॥ १९८ ॥
‘ आवहंतीवितन् ‘ मंत्रे । वस्त्र नेसावें पवित्र ।
द्विराचमन करावें तत्र । वस्त्र पिळोनि आचमन कीजे ॥ १९९ ॥
आतां मंत्रस्नान करणें । सांगेन त्याचीं विधानें ।
‘ आपोहिष्ठा ‘ दि मंत्रानें । प्रोक्षावें आपुले शरीरावरी ॥ २०० ॥
पाद-मूर्ध्नी-हृदयस्थानीं । मूर्ध्नी-हृदय-पाद प्रोक्षोनि ।
हृदय-पाद-शिरस्थानीं । ‘ आपोहिष्ठा ‘ दि मंत्रेसीं ॥ २०१ ॥
ऐेसें स्नान करोनि । पुनः आचमन करोनि ।
मानसस्नान विधानीं । करावें ऐका भक्तीनें ॥ २०२ ॥
नारायण-मूर्तीसी । ध्यान करावें भक्तीसीं ।
चतुर्भुजालंकारेसीं । ध्यान केलिया मानसस्नान ॥ २०३ ॥
‘ अपवित्रः पवित्रो वा– ‘ । येणें मंत्रें हरि ध्यावा ।
उदकें शरीर प्रोक्षावें । स्नानफळ असे अवधारा ॥ २०४ ॥
नदीतीरीं असे नरु । अशक्त असे शरीरु ।
स्मरण करुनि नदी निर्धारु । आर्दवस्त्रें अंग पुसावें ॥ २०५ ॥
मंगलस्नानविधान । सांगेन ऐका ब्राह्मण ।
रविवारीं निषेध जाण । ज्वर होय अंगासी ॥ २०६ ॥
कांतिहानि सोमवारासी । मंगलवारीं मृत्यु परियेसीं ।
लक्ष्मी पावे बुधवारेंसी । धनहानि होय गुरुवारीं ॥ २०७ ॥
शुक्रवारीं पुत्रघात । शनिवारीं अखिल संपत प्राप्त ।
जाणा तुम्हीं निश्र्चित । मंगलस्नान करावें ॥ २०८ ॥
नदीस्नान प्रवाहमुखी । घरी प्रातःपूर्वमुखी ।
संध्याकाळीं पश्र्चिममुखी । स्नान करावें अवधारा ॥ २०९ ॥
स्नान करितां नदीसी । अघमर्षण करावें परियेसीं ।
‘ नमोऽग्नयेऽप्सुमते ‘ मंत्रासीं । नमस्कारावें नदीतें ॥ २१० ॥
‘ यदपांक्रूरं ‘ मंत्रेसीं । उदक लोटावे द्विहस्तेसीं ।
तीन वेळा लोटोनि हषा । ‘ इमं मे गंगे ‘ जपावें ॥ २११ ॥
‘ ऋतं च सत्यं च ‘ मंत्र जपत । स्नान करावें गंगेंत ।
नदीस्नानविधिख्यात । करा तुम्ही विप्रवर्ग ॥ २१२ ॥
रोदनांतीं करुनि वांति । मैथुन-दुःस्वप्न-दर्शनांतीं ।
स्नानाविणें शुद्ध न होती । स्नान करावें अवधारा ॥ २१३ ॥
आतां वस्त्राचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
वस्त्र काषाय जाण । नेसूं नये गृहस्थानें ॥ २१४ ॥
रक्तादि वस्त्र जीर्ण अधौत । नेसूनि जें आचरत ।
तें पुण्य जाय राक्षसांप्रत । एक धोत्र असलिया ॥ २१५ ॥
श्र्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य असे परियेसीं ।
असावें उपवस्त्र बहिर्वासी । ‘ उपवस्त्र ‘ म्हणिजे तया ॥ २१६ ॥
धोत्र नेसलिया उपरी । विभूति लावावी परिकरी ।
मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण करावें ॥ २१७ ॥
भस्म शुद्ध न मिळे जरी । गोपीचंदन लावा परिकरी ।
द्वारावती मुख्य करीं । वरकड मृत्तिका अग्राह्य ॥ २१८ ॥
न मिळे द्वारावती देखा । करा धारण गंगामृत्तिका ।
ऊर्ध्वपुंड्र असे निका । विष्णुसायुज्य होय तयां ॥ २१९ ॥
पुष्टिकाम असे ज्यासी । लावावें तेणें अंगुष्ठेसीं ।
ज्यासी काम असे आयुषीं । मध्यांगुलीं लावावें ॥ २२० ॥
अन्नकाम अनामिकेसीं । तर्जनी काम्य-मुक्तीसी ।
जे लाविती नखेसीं । महापातक घडे तयां ॥ २२१
उत्तम रुंदी दशांगुलीं । मध्यम नव अष्ट अंगुलीं ।
सप्त सहा पंचांगुलीं । शूर्पाकार लावावें ॥ २२२ ॥
चतुर्थ त्रीणि द्वयांगुलीं । अधम पक्ष असे बोली ।
द्वादश नामें करा भलीं । विष्णुनाम उच्चारित ॥ २२३ ॥
केशव म्हणावें ‘ ललाट ‘ स्थानीं । नाभीं ‘ नारायण ‘ म्हणोनि ।
‘ माधव ‘ नामें हृदयस्थानीं । कमळपुष्पाकार देखा ॥ २२४ ॥
‘ गोविंद ‘ नामें कंठेसी । ‘ विष्णु ‘ नाभिं-दक्षिणेसी ।
दक्षिण भुजा ‘ मधुसूदने ‘ सी । दक्षिणकर्णी ‘ त्रिविक्रम ‘ ॥ २२५ ॥
‘ वामन ‘ नाभि-वामी देखा । ‘ श्रीधर ‘ वामबाहुका ।
‘ हृषीकेश ‘ वामकर्णिका । ‘ पद्मनाभ ‘ पश्र्चिमकटीं ॥ २२६ ॥
‘ दामोदर ‘ शिखास्थान । ऐका ऊर्ध्वपुंड्र विधान ।
पापें जातीं जळोन । गोपींचदन लावितां ॥ २२७ ॥
द्वारावती लावोनि । लावा भस्म त्रिपुंड्रांनीं ।
हरिहर संतोषोनि । भुक्ति मुक्ति साधे देखा ॥ २२८ ॥
विवाहादि शोभन-दिवसीं । देवताकृत्य-श्राद्धदिवसीं ।
अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन वर्जावें ॥ २२९ ॥
ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन विस्तारेंसीं ।
आहेति दश प्रकारेंसीं । नामें सांगेन विख्यात ॥ २३० ॥
दूर्वा उशीर कुश काश । सकुद गाधूम व्रीहि मौंजीष ।
नागरमोथा भद्रमुस्ता परियेसा । दश दर्भ मुख्य असती ॥ २३१ ॥
नित्य आणावें दूर्वेसी । जरी न साधे आपणासी ।
श्रवण-भाद्रपद-अमेसी । संग्रह संवत्सरीं करावा ॥ २३२ ॥
चारी दुर्वा विप्रासी । त्रीणि जाणा क्षत्रियासी ।
द्वय दूर्वा वैश्यासी । शूद्रें एक धरावी ॥ २३३ ॥
या दूर्वेची महिमा । सांगतां असे अनुपमा ।
अग्रस्थानीं असे ब्रह्मा । मूळीं रुद्र मध्यें हरि ॥ २३४ ॥
अग्रभागीं चतुरंगलें । ग्रंथिमूळीं द्वयांगुलें ।
धारण करावें ब्रह्मकुळें । याची महिमा थोर असे ॥ २३५ ॥
चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य पराभवी ऐका ।
ईश्र्वर त्रिशूल धरितां देखा । राक्षसांतक जेवीं होय ॥ २३६ ॥
इंद्र वज्रायुध धरितां । दैत्यगिरी विभांडी तत्त्वतां ।
तैसे ब्राह्मण दूर्वा धरितां । पापदुरिता पराभवती ॥ २३७ ॥
जैसे तृणाचे पर्वतासी । अग्निस्पर्श होतां कैशी ।
तेवीं असलिया पापराशि । दर्भस्पर्शें जळती देखा ॥ २३८ ॥
ब्रह्मयज्ञ-जपसमयीं । ग्रंथि न बांधावी कुशद्वयीं ।
वर्तुळाकार भोजनसमयीं । धरावी ब्राह्मणें भक्तीनें ॥ २३९ ॥
कर्म आचरतां दूर्वेसीं । ग्रंथि बांधावी परियेसीं ।
अग्निस्पर्श कापुसासी । पाप नाशी येणेंपरी ॥ २४० ॥
एकादशांगुल प्रादेशमात्र । द्विदल असावें पवित्र ।
नित्य-कर्मासि हेंच पात्र । द्विदल जाणा मुख्य असे ॥ २४१ ॥
जपहोमादि दानासी । स्वाध्याय-पितृकर्मासी ।
सुवर्ण-रजतमुद्रिकेसीं । कुशावेगळें न करावें ॥ २४२ ॥
देवपितृकर्मासी देख । रजत करावें सुवर्णयुक्त ।
तर्जनीस्थानीं रौप्यमुद्रिका । सुवर्ण धरावें अनामिकेसी ॥ २४३ ॥
मुद्रिका असावी खड्गपात्री । कनिष्ठिकांगुलीं पवित्रीं ।
ग्राह्य नव्हे जिवंतपित्री । तर्जनीअंगुलीं मुद्रिका ॥ २४४ ॥
योगपट्ट-उत्तरी देखा । तर्जनीस्थानीं रौप्यमुद्रिका ।
पायीं न घालाव्या पादुका । गयाश्राद्ध न करावें ॥ २४५ ॥
नवरत्न-मुद्रिका ज्याचे हातीं । पापें त्यासी न लागती ।
एखादें रत्न जरी असे हातीं । मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥ २४६ ॥
प्रातःसंध्येचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
नक्षत्रें असतांचि प्रारंभून । अर्घ सूर्योदयीं द्यावें ॥ २४७ ॥
सूर्योदय होय तंव । जप करीत उभें असावें ।
उदयसमयीं अर्घ्य द्यावें । तत्पूर्वी देणें सर्व व्यर्थ ॥ २४८ ॥
ऋषि पुसती पराशरासी । संध्या करावया विधि कैसी ।
विस्तारोनि सांगा आम्हांसी । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ २४९ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासीं । सांगेन संध्याविधीसी ।
ऐका तुम्ही तत्परेसीं । पराशरस्मृतीं असे ॥ २५० ॥
गायत्रीमंत्र जप करितां । शिखा बांधावी त्वरिता ।
आसन घालोनि निरुता । चित्त दृढ करावें ॥ २५१ ॥
ब्राह्मतीर्थें त्रिराचमन । विष्णुनाम स्मरोन ।
प्राणायाम विस्तारोन । न्यासपूर्वक करावे ॥ २५२ ॥
प्रणवस्थानीं परब्रह्म-ऋषि । गायत्री-छंदासी ।
अग्नि-देवता परियेसीं । म्हणा ‘ प्राणायामे विनियोगः ‘ ॥ २५३ ॥
ॐ अं -नाभी, उं-दय । मं –मूर्धी स्पर्श अवयव ।
व्याहृति सप्त अतिशया । पृथक् देव ऋषि सांगेन ॥ २५४ ॥
व्याहृति सप्तै स्थानासी । ऐका असे प्रजापति-ऋषि ।
पृथक् देवता परियेसीं । सात नामें देवांची ॥ २५५ ॥
अग्नि-वायु-सूर्य-जीव । वरुण-इंद्र-विश्र्वेदेव ।
सप्त व्याहृती सात देव । छंदही सप्त सांगेन ॥ २५६ ॥
‘ गायत्री ‘ – ‘ उष्णिक ‘ – ‘ अनुष्टुप ‘ देखा । ‘ बृहती ‘ –पंक्ति पंचम ऐका ।
‘ त्रिष्टुप ‘ – ; ‘जगती ‘ –छंद विशेखा । प्राणायामे विनियोगः ॥ २५७ ॥
ॐ भूः —पादन्यास । भुवः —जानु’ सुवः–कटि विशेष ।
महः –नाभिस्थान स्र्पर्श । जनः –हृदय, तपः–कंठ ॥ २५८ ॥
सत्यं–भ्रुवललाट स्थान । गायत्र्यागायत्री–छंदासी म्हणा ।
सविता- देव, विश्र्वामित्र–ऋषि खुणा । प्राणायामे विनियोगः ॥ २५९ ॥
ॐ भूः-हृदयाय नमः । ॐ भुवः–शिरसे स्वाहा ।
ॐ सुवः –शिखायै वषट् । ॐ ‘ तत्सवितुर्वरेण्यं ‘–कवचाय हुं ॥ २६० ॥
ॐ ‘ भर्गोदेवस्य धीमहि ‘ –नेत्रत्रयाय वौषट् ।
‘ धियोयोनः प्रचोदयात् ‘ अस्त्राय फट् । ॐ भूर्भुवः स्वः’ इति दिग्बंधः ऐसे षडंग करावे ॥ २६१ ॥
प्राणायाम करावयासी । प्रजापति म्हणा ऋषि ।
देवतानामें परियेसीं । ब्रह्मा-अग्नि-वायु-सूर्य असे ॥ २६२ ॥
‘ प्रानायामे विनियोगः ‘ म्हणूनि । ‘ आपो ‘ स्तन स्पर्शोनि ।
‘ ज्योति ‘ नेत्रस्पर्श करुनि । ‘ रसो ‘ –जिव्हा, ‘ अमृतं ‘ –ललाट स्पर्शावें ॥ २६३ ॥
‘ ब्रह्मभूर्भुवः-स्वरोम् ‘ म्हणूनि । प्राणायाम करावे तीनि ।
त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्व सिद्धि ॥ २६४ ॥
या गायत्रीच्या अधिदेवता । ब्रह्मा-अग्नि-वायु-गभस्ता ।
ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्तलोकन्यास सांगेन ॥ २६५ ॥
‘ पाद ‘ न्यास भूर्लोक । भुवः- ‘ जानु ‘ अतिविशेख ।
स्वः –गुह्य असे लोक । ‘ नाभि ‘ न्यास महर्लोक ॥ २६६ ॥
जनो–‘ हृदय ‘ , तपो –‘ ग्रीवे ‘ । भ्रुवोर्ललाटे– सत्यलोक म्हणावें ।
असे शिरस्थान बरवें । सत्यलोक म्हणती तयासी ॥ २६७ ॥
गायत्रीची प्रार्थना करुनि । प्राणायाम करा विधीनीं ।
ब्रह्मचारी गृहस्थांनी । पंचांगुलीं धरा परमेष्ठी ॥ २६८ ॥
वानप्रस्थ -संन्यासीं । अनामिका – कनिष्टिकांगुष्टेंसीं ।
ओंकारादि वायुपूरकेंसीं । दक्षिणनासापुटें चढवावें ॥ २६९ ॥
वामनासापुटीं विसर्जोनि । करा प्राणायाम तीनि ।
येणेंचि विधीं करा मुनि । त्रिकाळींचे संध्या कर्म ॥ २७० ॥
आतां करा मार्जनासी । सांगेन ऐका समस्त ऋषि ।
जैसें असे स्मृतिचंद्रिकेसी । तेणें विधीं सांगतो ॥ २७१ ॥
‘ आपोहिष्टे ‘ ति सूक्तस्य । सिंधुद्वीप-ऋषि, गायत्री-छंदेसीं ।
‘ आपोदेवता ‘ मार्जनासी । हा म्हणावा विनियोग ॥ २७२ ॥
‘ आपोहिष्ठा ‘ ऐसे मंत्र म्हणोन । कुशपवित्रें करा मार्जन ।
‘ यस्य क्षयाय ‘ मंत्रानें । आपुले पाद प्रोक्षावे ॥ २७३ ॥
‘ आपोजनयथा ‘ मंत्रेसीं । प्रोक्षावें आपुल्या शिरसीं ।
‘ सूर्यश्र्चे ‘ ति-मंत्रेसीं । उदक प्राशन करावें ॥ २७४ ॥
आचमनें करोनि दोनी । ‘ दधिक्राव्णो ‘ मंत्र जपोनि ।
करा मार्जन तुम्ही तीनि । पुनरपि ‘ आपोहिष्ठा-‘ म्हणा ॥ २७५ ॥
‘ हिरण्यवर्ण ‘ सूक्तेसीं । मार्जन करावें परियेसीं ।
‘ द्रुपदादिवेति ‘ मंत्रेसीं । घ्राणोनि उदक सांडा वामीं ॥ २७६ ॥
मार्जन करावयाचें विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
वामहस्तीं पात्र धरुन । मार्जन करा विशेषीं ॥ २७७ ॥
औदुंबर-सुवर्ण-रजत । काष्ठपात्र असे पवित्र ।
ऐसें पात्र न मिळे यत्र । वामहस्तीं उदक घ्यावें ॥ २७८ ॥
मृण्मय अथवा द्विमुख पात्र । भिन्न भांडें त्यजा अपवित्र ।
अग्राह्य वर्जा देवपितरां । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ २७९ ॥
मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसीं अष्ट, पादीं नवका ।
‘ यस्यक्षयाय ‘ स्थान भूमिका । येणेंपरी मार्जन ॥ २८० ॥
‘ आपः पुनंतु ‘- मंत्रेसीं । प्राशन करावें माध्याह्नेसी ।
‘ अग्निश्र्चे ‘ ति -मंत्रेसी । संध्याकाळीं करावें ॥ २८१ ॥
प्राशनांती तुम्ही ऐका । द्विराचमन करा निका ।
आघ्राणूनि उदक सांडोनि देखा । एक आचमन करावें ॥ २८२ ॥
अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन ऐका ऋषिजन ।
गोशृंगाइतके उंच करुन । अर्घ्य द्यावें मनोभावें ॥ २८३ ॥
गायत्रीमंत्र जपोनि । सायंप्रातर्द्यावीं तीनी ।
‘ हंसः शुचिषन् ‘ मंत्रेसीं माध्याह्नीं । अर्घ्य द्यावें अवधारा ॥ २८४ ॥
प्रातर्माध्याह्नीं उभें बरवें । सायं अर्घ्य बैसोनि द्यावें ।
आचमन त्रिवार करावें । करा प्रदक्षिणा ‘ असावादित्य ‘ ॥ २८५ ॥
अर्घ्य द्यावयाचें कारण । सांगेन कथा विस्तारोन ।
राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि आहेति देखा ॥ २८६ ॥
सूर्यासवें युद्धासी । नित्य येती परियेसीं ।
संदेह पडे देवांसी । सूर्या होईल अपजय ॥ २८७ ॥
अपजय होतां सूर्यासी । उदय-अस्तमान नव्हे परियेसीं ।
कर्मे न चालती ब्राह्मणांसी । स्वाहा-स्वधाकार न चाले ॥ २८८ ॥
स्वाहा-स्वधाकार रहाती । समस्त देवांस उपवास घडती ।
सृष्टि राहील नव्हे उत्पत्ति । म्हणोनि उपाय रचियेला ॥ २८९ ॥
याचि कारणें अर्घ्यें देती । तींचि वज्रायुधें होतीं ।
जावोनि दैत्यांसी लागतीं । पराभविती प्रतिदिवसीं ॥ २९० ॥
दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी वधिलिया घडती दोष ।
प्रदक्षिणा करितां जाती दोष । ‘ असावादित्य ‘ म्हणोनियां ॥ २९१ ॥
ब्रह्महत्येचे पापासी । भूप्रदक्षिणा दोष नाशी ।
चारी पावलें फिरतां कैसी । भूप्रदक्षिणा पुण्य असे ॥ २९२ ॥
संध्या करावयाचें स्थान । सांगेन ऐका फलविधान ।
घरीं करितां प्रतिदिन । एकचि फळ अवधारा ॥ २९३ ॥
दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस केलिया शतफल ऐका ।
पुष्करतीर्थीं सहस्त्र एक । गंगा-सुरनदीं कोटिफल ॥ २९४ ॥
सुरापान दिवामैथुन । अनृतवाक्यादि पाप जाण ।
संध्या बाहेर करितां क्षण । जळतीं पापें प्रत्यक्ष ॥ २९५ ॥
स्थानें असती जप करावयासी । विस्तारें सांगेन तुम्हांसी ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । एकचित्तें परियेसा ॥ २९६ ॥
जप केलिया घरीं ऐका । एकचि फल असे निका ।
बाहेर द्विगुण फल अधिका । नदीसी त्रिगुण फळ असे ॥ २९७ ॥
गोष्ठ वृंदावनीं देखा । दशगुण फळ आहेति अधिका ।
अग्निहोत्रादि स्थानीं निका । शताधिक फलें असती ॥ २९८ ॥
तीर्थ-देवतासन्निधानीं । सहस्त्रफल असे निर्गुणी ।
शतकोटि फल परिसन्निधानी । ईश्र्वरसन्निधानीं अनंत फळ ॥ २९९ ॥
जप करितां आसनासी । विधिनिषेध आहेति कैसी ।
सांगेन ऐका तात्पर्येसीं । पुण्य पाप बोलिलें असे ॥ ३०० ॥
भिन्नकाष्ठासनीं बैसोनि जरी । जप करिती मनोहरी ।
दुःख होय त्यास अपारीं । तृणीं भाग्य यश जाय ॥ ३०१ ॥
पल्लवशाखांसी बसतां । सदा होय दुश्र्चित्तता ।
वंशासनीं दरिद्रता । पाषाणासनीं व्याधि होय ॥ ३०२ ॥
भस्मासनीं व्याधिनाश । कंबलासनी सुख परियेस ।
कृष्णाजिनीं ज्ञानप्रकाश । व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया ॥ ३०३ ॥
कुशासनीं वशीकरण । सर्व रोग अपहरण ।
पापें जातीं पळोन । आयुः प्रज्ञा अधिक होय ॥ ३०४ ॥
‘ ओं ‘ इत्येकाक्षर ब्रह्म- मंत्र । जपा तुम्हीं पवित्र ।
ध्यान करावें गायत्र । समस्त पापें हरती देखा ॥ ३०५ ॥
या गायत्रीची स्वरुपता । अभिनव असे वर्णितां ।
रक्तांगी वास रक्ता । हंसवाहन असे देखा ॥ ३०६ ॥
‘ अ–कारब्रह्माऽधिदेवता । चतुर्भुजा चतुर्वक्त्रा ।
कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला असे करीं ॥ ३०७ ॥
ऋग्वेद असे समागमीं । ‘ अग्निहोत्रफलमावाहयामि ‘ ।
मग ‘ आयातु वरदा देवी ‘ ‘ ओजोऽसि ‘ । म्हणावें ऐका ब्राह्मणानें ॥ ३०८ ॥
या मंत्रासी ऋषिदेवता । गायत्री-सदृश असे ख्याता ।
प्रातःसंध्या तुम्ही करितां । विधान तुम्हां सांगेन ॥ ३०९ ॥
विश्र्वदेवा-ऋषयः । गायत्री-देवता गायत्री-छंदः ।
गायत्र्यावाहने विनियोगः । हें प्रातःसंध्येसी म्हणावें ॥ ३१० ॥
सावित्री–देवता । सावित्री–छंदः ।
सावित्र्यावाहने विनियोगः । हें माध्याह्नसंध्येसी म्हणावे ॥ ३११ ॥
सरस्वती- देवता । सरस्वती–छंदः ।
सरस्वत्यावाहने विनियोगः । हें सायंसंध्येसी म्हणावें ॥ ३१२ ॥
प्रातःसंध्येचें ध्यान । सांगेन ऐका तुम्ही गहन ।
अभिभूरों गायत्री जाण । बालरुपिणी असे देखा ॥ ३१३ ॥
अकार ब्रह्मा दैवत खूण । सांगेन सर्व विस्तारोन ।
रक्तांगी रक्तवसन । हंसासनीं आरुढ असे ॥ ३१४ ॥
चतुर्बाहु चतुर्मुख । कमंडलु धरिला विशेख ।
अक्षसूत्र चाटुहस्तक । ऋग्वेदसहित अग्निहोत्र फळ ॥ ३१५ ॥
ऐसें ध्यान करोन । मग जपा अक्षरज्ञान ।
एकचित्तें करावें ध्यान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ३१६ ॥
ओंकार-शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३१७ ॥
ऐसें म्हणोनि प्रातःकाळीं । संध्या करावी सुवेळीं ।
आतां सांगेन माध्याह्नकाळीं । ध्यान आवाहनपूर्वक ॥ ३१८ ॥
अभिभूरों सावित्री यौवन । माध्याह्नसंध्या ध्यान ।
सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्तें परियेसा ॥ ३१९ ॥
श्र्वेतांगी श्र्वेतवस्त्र । वाहन वृषभ पवित्र ।
उ–कार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे देखा ॥ ३२० ॥
वरद-अभयस्त निका । रुद्राक्षमाळा-त्रिशूलधारका ।
यजुर्वेदसहित देखा । अग्निष्टोम फल जाणा ॥ ३२१ ॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषिनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । हिृयमावाहयामि ॥ ३२२ ॥
आतां सायंसंध्याध्यान । सांगेन ऐका विधान ।
एकचित्तें ऐका वचन । ध्यानपूर्वक सांगेन ॥ ३२३ ॥
अभिभूरों सरस्वती वृद्धा । जाणावी तुम्ही सांयसंध्या ।
कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधा । गरुडवाहन असे देखा ॥ ३२४ ॥
म–कार विष्णुदेवता । चतुर्भुज शंखचक्रधृता ।
गदापद्नधारणहस्ता । सामवेदसहित जाणा ॥ ३२५ ॥
वाजपेयफल जाणा । सायंसंध्या असे ध्यान ।
करावें तुम्हीं ब्राह्मण । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥ ३२६ ॥
ओंकार–शिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि ॥ ३२७ ॥
गायत्र्यागायत्री छंदः । प्रणवस्य अंतर्यामी ऋषिः ।
परमात्मा देवता परियेसीं । पंचशिर्षोपनये विनियोगः ॥ ३२८ ॥
उदात्तस्वरित स्वरः । शुक्लवर्णः ज्योतिःस्वरुपम् ।
सर्व देवमयं जगत्स्वरुप । अकार-उकार-मकाराणाम् ॥ ३२९ ॥
अग्निवायुसूर्या ऋषयः । गायत्री-त्रिष्टुप्-जगती-छंदासि ।
ब्रह्माविष्णुमहेश्र्वरा देवताः । ऋग्यजुःसामानि स्वरुपाणि ॥ ३३० ॥
आहवनीयाग्निगार्हपत्य- । दक्षिणाग्नि उपस्थानानि ।
पृथ्विव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि । उदात्तअनुदात्तस्वरित–स्वराः ॥ ३३१ ॥
पीत-विद्युत्-कृष्णवर्णी । प्रातर्मध्याह्नतृतीयसवनी ।
विश्र्वतैजसप्राज्ञस्वरुपिणी । जागृतिस्वप्नसुषुप्त्यवस्था ॥ ३३२ ॥
ऐसें त्रिपदा गायत्रीसी । सांगितले त्रिविध ध्यानासी ।
आतां विधान जपासी । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ३३३ ॥
ममोपात्तदुरितक्षयद्वारा । श्रीपरमेश्र्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
ओं ‘ अं ‘ नामौ । ‘ उं ‘ हृदये, ‘ मं ‘ कंठे ॥ ३३४ ॥
ॐ ‘ भूः ‘ अक्षरमंत्रासी । गायत्री असे छंदेसी ।
अग्नि-देवता परियेसीं । विश्र्वामित्र-ऋषि देखा ॥ ३३५ ॥
षड्जस्वर श्र्वेत वर्ण । पाद स्पर्शा उच्चारोन ।
प्राणायामे विनियोगून । दुसरी व्याहृति म्हणावी ॥ ३३६ ॥
ॐ ‘ भुवः ‘ -अक्षरमंत्रासी । उष्णिक्-नाम छंदासी ।
वायुदेवता परियेसीं । भृगुऋषि असे जाणा ॥ ३३७ ॥
ऋषभेश्र्वर असे जाण । असे रुप श्यामवर्ण ।
करा तुम्ही ऐसें ध्यान । जानूमध्यें न्यासावें ॥ ३३८ ॥
प्राणायामे विनियोगः म्हणोनि । न्यास करा भक्तींनी ।
ॐ ‘ सुवः ‘ -व्याहृति म्हणोनि । ध्यान करावें भक्तिनें ॥ ३३९ ॥
सुवः- व्याहृतिमंत्रासी । म्हणा अनुष्टुप्-छंदासी ।
सवितादेवता परियेसीं । भारद्वाजऋषि जाणा ॥ ३४० ॥
स्वर-गांधार पीतवर्णा । कटि स्पर्शोनि मंत्र म्हणा ।
प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय व्याहृतिमंत्रासी ॥ ३४१ ॥
ॐ ‘ महः ‘ मंत्रासी । म्हणा बृहतीछंदासी ।
बृहस्पतिदेवता परियेसीं । वसिष्ठऋषि अवधारा ॥ ३४२ ॥
मध्यम-स्वर, पिशंगवर्ण । ऐसें करा तुम्ही ध्यान ।
नाभीं स्पर्शोन म्हणा । ‘ प्राणायामे विनियोगः ‘ ॥ ३४३ ॥
ॐ ‘ जनः ‘–मंत्रउच्चारासी । म्हणा पंक्तिछंदासी ।
वरुणादेवता, गौतमऋषि । पंचमस्वर असे जाण ॥ ३४४ ॥
रुप असे नीलवर्ण । करा न्यास हृदयस्थान ।
प्राणायामे विनियोगून । जनः न्यास ऐसा असे ॥ ३४५ ॥
ॐ ‘ तपः ‘ –मंत्रन्यासासी । त्रिष्टुपछंद परियेसीं ।
इंद्रदेवता, कश्यपऋषि । धैवतस्वर परियेसा ॥ ३४६ ॥
असे आपण लोहित – वर्ण । स्पर्श करावें कंठस्थान ।
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा ब्राह्मण हो ॥ ३४७ ॥
ॐ ‘ सत्यं ‘ म्हणिजे मंत्रासी । जाणा जगती छंदासी ।
विश्र्वेदेवता, अंगिरसऋषि । निषादस्वर असे जाण ॥ ३४८ ॥
रुप असे कनकवर्ण । भुवोर्ललाट स्पर्शस्थान ।
प्राणायामे विनियोगून । न्यास करावा भक्तिनें ॥ ३४९ ॥
इतुके न्यास करोनि । हस्त ठेवोनि शिरस्थानीं ।
ध्यान करा विधीनीं । सांगेन ऐक ब्राह्मणा ॥ ३५० ॥
शिरस्थान स्पर्शासी । म्हणा अनुष्टुप्छंदासी ।
उच्चारावा प्रजापतिऋषि । परमात्मादेवता जाण ॥ ३५१ ॥
प्राणायामे विनियोगून । मग करावें गायत्रीं ध्यान ।
ॐ ‘ आपोज्योति ‘ म्हणोन । मंत्र म्हणावा भक्तीनें ॥ ३५२ ॥
ॐ ‘ आपोज्योतिरसोमृतं । ब्रह्मभूर्भुवःसुवरों ।
शिरसीं स्थान, येणेंविधि । अंगन्यास करावे ॥ ३५३ ॥
चव्वीस अक्षरें गायत्रीसी । न्याय सांगेन एकेकासी ।
एकचित्तें परियेसीं । म्हणे पराशर ऋषीश्र्वर ॥ ३५४ ॥
या त्रिपदागायत्रीसी । असे विश्र्वामित्रऋषि ।
दैवीगायत्रीछंदेसीं । वर्ण-देवता सांगेन ॥ ३५५ ॥
” ॐ तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो । नः प्रचोदयात् ” ॥ ३५६ ॥
ऐसें त्रिपदा गायत्रीमंत्रासी । चव्वीस अक्षरें परियेसीं ।
पृथक् न्यास विस्तारेसीं । सांगेन ऐक द्विजोत्तमा ॥ ३५७ ॥
‘ तत् ‘ वर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
अग्निदेवता परियेसीं । गायत्री छंद म्हणावा ॥ ३५८ ॥
सुवर्णचंपक पुष्पें जैसीं । रुप तैसें जाणा त्यासी ।
ध्यान केलिया पाप नाशी । ‘ पादांगुष्ठीं ‘ न्यास जाणा ॥ ३५९ ॥
‘ स ‘ वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
वायुदेवता परियेंसी । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६० ॥
अतसीपुष्पें वर्णे जैसीं । रुप त्यांचे परियेसीं ।
उपपातक दोष नाशी । ‘ गुल्फन्यास ‘ करावा ॥ ३६१ ॥
‘ वि ‘ वर्णनाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
सूर्यदेवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६२ ॥
‘ जंघास्थानीं ‘ असे न्यास । सौम्यरुप कपिल वर्ण सुरस ।
महापापें दहतीं परियेस । –विवर्णाचें लक्षण ॥ ३६३ ॥
‘ तु ‘ वर्ण नाम अक्षरासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
विद्युत्-देवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६४ ॥
न्यास करावया ‘ जानुस्थान ‘ । इंद्रनील विद्युद्वर्ण ।
ऐसें अक्षरविधान । महारोग हरती देखा ॥ ३६५ ॥
‘ र्व ‘ वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
यमदेवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६६ ॥
न्यास करा ‘ ऊरुस्थानीं ‘ । दीप्ति असे जैसा वन्हि ।
रुप असे सौम्यपणीं । भ्रूणहत्या पाप नाशी ॥ ३६७ ॥
‘ रे ‘ वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
वरुणदेवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३६८ ॥
शुद्ध-स्फटिक-कांति । ‘ गुह्यस्थानीं ‘ न्यास बोलती ।
अगम्यागमन दोष नाशतीं । रे–वर्णस्थाना उत्तम ॥ ३६९ ॥
‘ णि ‘ वर्णाक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
बृहस्पति-देवता परियेसीं । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३७० ॥
णि-कार ‘ वृषभस्थान ‘ जाणा । विद्यत्प्रकाश रुपधारणा ।
बार्हस्पत्य नाम खुणा । अभक्ष्यपापक्षालन ॥ ३७१ ॥
‘ यं ‘ अक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
पर्जन्यदैवत परियेसी । दैवीगायत्रीछंद असे ॥ ३७२ ॥
यं- ‘ कटिस्थान ‘ तारकावर्ण । देहहत्यापापज्वलन ।
न्यास करावें सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा ॥ ३७३ ॥
भ-कारा ‘ नाभीं ‘ करा व्यास । कृष्णमेघवर्ण सुरस ।
इंद्रदेवता संकाश । गुरुहत्यापाप नाशी ॥ ३७४ ॥
‘ भ ‘ वर्ण नाम अक्षरासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
इंद्रदेवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३७५ ॥
‘ र्गो ‘ अक्षरा ‘ उदर ‘ न्यास । ध्यान रक्तवर्ण सुरस ।
गंधर्व–देवता परियेस । गोहत्येचें पाप जाय ॥ ३७६ ॥
‘ र्गो ‘ नाम अक्षरासी । जाणावा विश्र्वामित्र-ऋषि ।
गंधर्व–देवता परियेसी । दैवीगायत्रीछंद देखा ॥ ३७७ ॥
‘ दे ‘ –कारन्यास ‘ स्तनासी ‘ । पूषा नाम देव परियेसीं ।
स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्तें परियेसा ॥ ३७८ ॥
‘ दे ‘ वर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
पूषा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद देखा ॥ ३७९ ॥
‘ व ‘ -कारा ‘ हृदयस्थान न्यास । शुक्लरुप वर्ण परियेस ।
रुद्र-देवता असे त्यास । वाग्जातपाप नाशी ॥ ३८० ॥
‘ व ‘ वर्णाक्षर मंत्रासी । जाणावा विश्र्वामित्र ऋषि ।
रुद्र-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८१ ॥
स्य-अक्षरा ‘ कंठन्यास ‘ । कांचनवर्ण रुप सुरस ।
त्वष्टा देवता परियेस । मानकौटिल्य पाप जाय ॥ ३८२ ॥
‘ स्य ‘ वर्ण अक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्रऋषि ।
त्वष्टा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८३ ॥
‘ धी ‘ काराक्षरमंत्रा ‘ दंतीं ‘ न्यास । शुक्लकुमुद-संकाश ।
वसु-देवता परियेस । पितृहत्यापाप जाय ॥ ३८४ ॥
‘ धी ‘ वर्ण नाम अक्षरासी । जाणा विश्र्वामित्रऋषि ।
वसु देवता परियेसी । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८५ ॥
‘ म ‘-कारन्यास ‘ तालुस्थान ‘ । पद्मराग तेज जाण ।
मरुत्-देवता असे खूण । सर्वजन्मपाप जाय ॥ ३८६ ॥
‘ म ‘ वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
मरुत्-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८७ ॥
हि-कारा ‘ नासिकीं ‘ करा न्यास । शंखवर्ण असे त्यास ।
सोम-देवता परियेस । सर्व पापहरण होय ॥ ३८८ ॥
‘ हि ‘ वर्ण नाम मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
सोम-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३८९ ॥
‘ धि ‘ -कारा ‘ नेत्रस्थानीं ‘ न्यास । पांडुरमास संकाश ।
अंगिरा-देवता परियेस । पाणिग्रहणपाप नाशी ॥ ३९० ॥
‘ धि ‘ वर्ण नाम अक्षरासी । तोचि विश्र्वामित्र-ऋषि ।
-अंगिरा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९१ ॥
यो-काराक्षर मंत्रासी । ‘ भ्रुवोर्मध्ये ‘ न्यासिजे त्यासी ।
रक्तगौरवर्ण रुपेसीं । प्राणिवधपाप जाय ॥ ३९२ ॥
‘ यो ‘ कार नाम वर्णासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
विश्र्वेदेव-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९३ ॥
यो कारा- ‘ ललाटस्थानीं ‘ न्यास । रुप रुक्माभसंकाश ।
सर्वपाप होय नाश । भक्तिपूर्वक न्यासावें ॥ ३९४ ॥
‘ यो ‘ वर्णाक्षरमंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
अश्र्विनौ-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९५ ॥
न–कारा न्यास ‘ प्राङ्गमुखा ‘ । उदित-सूर्यासमान देखा ।
प्रजापति-देवता असे निका । चिरंजिपद पाविजे ॥ ३९६ ॥
‘ न ‘ काराक्षर वर्णासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
प्रजापति-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९७ ॥
प्र-काराक्षरन्यास करोनि ‘ दक्षिणे ‘ । रुप असे इंद्रनील वर्ण ।
सर्वदेव-देवता जाण । सर्वदेवपदवी पाविजे ॥ ३९८ ॥
‘ प्र ‘ वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
सर्व-देवदेवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ३९९ ॥
चो-कार वर्ण मंत्रासी । न्यासिजे तया ‘ पश्र्चिम ‘ भागासी ।
कुंकुमरुप वर्ण त्यासी । कैलासपद पाविजे ॥ ४०० ॥
‘ चो ‘ कार वर्ण मंत्राक्षरासी । जाणावा विश्र्वामित्र-ऋषि ।
रुद्र-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०१ ॥
द-काराक्षराचा ‘ उत्तरे ‘ न्यास । शुक्लवर्ण रुप सुरस ।
करावें तुम्हीं ऐसे न्यास । ब्रह्मपद पाविजे ॥ ४०२ ॥
‘ द ‘ काराक्षर मंत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ॥
ब्रह्मा-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०३ ॥
या-कार ‘ मूर्धास्थानीं ‘ न्यास । सुवर्णरुप सुरस ।
विष्णुपदीं होय वास । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४०४ ॥
या वर्णाक्षर मंत्रासी । असे विश्र्वामित्र-ऋषि ।
विणु-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०५ ॥
त्–कार न्यास ‘ शिखास्थानीं ‘ । निरुपम वैष्णवभुवनीं ।
विष्णुरुप धरोनि । वैकुंठवास होय जाणा ॥ ४०६ ॥
‘ त् ‘ कार वर्णाक्षरममत्रासी । जाणा विश्र्वामित्र-ऋषि ।
विष्णु-देवता परियेसीं । दैवीगायत्री-छंद जाणा ॥ ४०७ ॥
ऐसे चव्वीस अक्षरमंत्रासी । न्यास करावें विधीसीं ।
हस्त ठेवोनियां शिरसीं । आणिक न्यास करावें ॥ ४०८ ॥
शिरस्थानन्यासासी । म्हणावें अनुष्टुप्-छंदासी ।
ख्यात प्रजापति-ऋषि । परमात्मा देवता जाणा ॥ ४०९ ॥
‘ प्राणायामे विनियोग: ‘ म्हणोनि । ‘ ओं आपो ‘ स्तन-स्थानीं ।
‘ ज्योति ‘ नेत्र स्पर्शोनि । ‘ रसो ‘ जिव्हा न्यासावें ॥ ४१० ॥
‘ अमृते ‘ ति ललाटेसी । मग स्पर्शोनि मूर्ध्नीसी ।
ब्रह्मभूर्भुवःस्वरोमे ‘ सीं । न्यास करावा विधिपूर्वक ॥ ४११ ॥
इतुके न्यास करोनि । गायत्री त्रिवार म्हणोनि ।
व्यापक न्यास करोनि । करशुद्धि करा तीन वेळां ॥ ४१२ ॥
‘ ॐ भूर्भुवःस्वः ‘ विन्यसोनि । गायत्री दशपादांनी ।
दशांगुलीं न्यासोनि । पादप्रमाण करावें ॥ ४१३ ॥
अंगुष्ठमूळ धरोनि । कनिष्ठिकाग्र स्पर्शोनि ।
उभय हस्त न्यासोनि । दशपाद न्यासावें ॥ ४१४ ॥
चव्वीस अक्षरमंत्रासी । अंगुलिन्यास करा हर्षी ।
तर्जनीमूळारंभेसीं । कनिष्ठिकाग्रपर्यंत ॥ ४१५ ॥
द्वादशाक्षरीं एकैक हस्त । करावे न्यास सुनिश्र्चित ।
व्यापक न्यास उपरान्त । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४१६ ॥
ओं ‘ भूः ‘ हिरण्यगर्भात्मने । अंगुष्ठाभ्यां नमः ।
ओं ‘ भुवः ‘ प्रजापत्यात्मने । तर्जनीभ्यां नमः ॥ ४१७ ॥
ओं ‘ स्वः ‘ सूर्यात्मने मध्यमाभ्यां नमः । ओं ‘ महः ‘ ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां नमः ।
ओं ‘ जनः ‘ विष्ण्वात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः । ॐ ‘ तपः ‘ रुद्रात्मने
करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥ ४१८ ॥
ॐ ‘ सत्यं ‘ सर्वात्मने अस्त्रायफट् । ॐ ‘ तत्सवितुः ‘ -अंगुष्ठाभ्यां नमः ।
‘ वरेण्यं ‘ –तर्जनीभ्यां नमः ।
‘ भर्गो देवस्य ‘ –मध्यमाभ्यां नमः । ‘ धीमहि ‘ –अनामिकाभ्यां नमः ॥ ४१९ ॥
‘ धियोयोनः ‘ –कनिष्ठिकाभ्यां नमः । ‘ प्रचोदयात् ‘ -करतलकरपृष्ठाभ्यां नमः ।
एवं उभय हस्तांगुलिन्यासं कुर्यात् । अथ षडंगन्यासाः ॥ ४२० ॥
ओं ‘ भूः ‘ हिरण्यात्मने –हृदयाय नमः । ओं ‘ भुवः ‘ प्रजापत्यात्मने-शिरसे स्वाहा ।
ओं ‘ स्वः ‘ सूर्यात्मने शिखायै वषट् । ओं ‘ महः ‘ ब्रह्मात्मने-कवचाय हुं ॥ ४२१ ॥
ओं ‘ जनः ‘ विष्ण्वात्मने-नेत्रत्रयाय वौषट । ओं ‘ तपः ‘ रुद्रात्मने-अस्त्रायफट् ।
ओं ‘ सत्यं ‘ सर्वात्मने-दिग्बंधः । ‘ ॐ तत्सवितु ‘ र्हृदयाय नमः ॥ ४२२ ॥
ॐ ‘ वरेण्यं ‘ शिरसे स्वाहा । ॐ ‘ भर्गोदेवस्य ‘ शिखायै वषट् ।
ॐ ‘ धीमहि ‘ कवचाय हुम । ॐ ‘ धियो योनः ‘ नेत्रत्रयाय वौषट् ॥ ४२३ ॥
ऐसा षडंगन्यास करोनि । अंग न्यासावें दशस्थानीं ।
त्यांचीं नांवें सांगेन विधानीं । एकचित्तें अवधारा ॥ ४२४ ॥
पाद-जानु-कटिस्थानीं । नाभि-हृदय-कंठभुवनीं ।
तालु-नेत्र स्पर्शोनि । ललाट-शिर दशस्थानें ॥ ४२५ ॥
गायत्रीमंत्र दहा पदांसी । दशस्थानें अंगन्यासासी ।
‘ तत् ‘ ‘ सवितु ‘ ‘ वरेण्ये ‘ सी । ‘ भर्गो ‘ ‘ देवस्य ‘ पंचमस्थान ॥ ४२६ ॥
‘ धीमहि ‘ म्हणिजे षष्ठस्थान । ‘ धियो ‘ सप्तमस्थान जाण ।
‘ यो ‘ कारो अष्टम धरिनि पूर्ण । अंगन्यास करावे ॥ ४२७ ॥
‘ न ‘ कार नवमस्थान । ‘ प्रचोदयात् ‘ दहावें जाण ।
अंगन्यास येणें गुण । करा तुम्ही द्विजोत्तमा ॥ ४२८ ॥
चतुर्विशति अक्षरांसी । करावें मग न्यासासी ।
पादांगुष्ठ धरुनि हर्षी । शिखापर्यंत न्यासावें ॥ ४२९ ॥
‘ तं ‘ अंगुष्ठाभ्यां नमः । ‘ त्सं ‘ गुल्फयोर्नमः ।
‘ विं ‘ जंघयोर्नमः । ‘ तुं ‘ जानुभ्यां नमः ॥ ४३० ॥
‘ वै ‘ ऊरुभ्यां नमः । ‘ रें ‘ गुह्याय नमः ।
‘ णिं ‘ वृषणाय नमः । ‘ यं ‘ कट्यै नमः ॥ ४३१ ॥
‘ भं ‘ नाभ्यै नमः । ‘ र्गों ‘ उदराय नमः ।
‘ दें ‘ स्तनाभ्यां नमः । ‘ वं ‘ हृदयाय नमः ॥ ४३२ ॥
‘ स्यं ‘ कंठाय नमः । ‘ धीं ‘ दंतेभ्यो नमः ।
‘ मं ‘ तालवे नमः । ‘ हिं ‘ नासिकायै नमः ॥ ४३३ ॥
‘ धिं ‘ नेत्राभ्यां नमः । ‘ यों ‘ भ्रुवोर्मध्याय नमः ।
‘ यों ‘ ललाटाय नमः । ‘ नः ‘ प्राङ्मुखाय नमः ॥ ४३४ ॥
‘ प्रं ‘ दक्षिणमुखाय नमः । ‘ चों ‘ पश्र्चिममुखाय नमः ।
‘ दं ‘ उत्तरमुखाय नमः । ‘ यां ‘ मूर्ध्ने नमः । ‘ तं ‘ शिखायै नमः ॥ ४३५ ॥
ऐसे न्यास करोनि । पुनः पादांगुष्ट धरोनि ।
कटीपर्यंत न्यासोनि । ऊर्ध्वन्यास करावे ॥ ४३६ ॥
त– कारा अंगुष्टस्थान । त्स–कार गुल्फ असे स्थान ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणा । जंघा स्पर्शा वि–कार मंत्रें ॥ ४३७ ॥
तु–कार जानू, र्व–कार ऊरवे । रे–कारें गुह्य स्पर्शावें ।
णि–कार वृषणीं न्यासा बरवें । य–कार कटिस्थानीं देखा ॥ ४३८ ॥
शिखा धरोनि नाभीपर्यंत । करावे न्यास उतरत ।
सांगेन त्यांचे आदिअंत । एकचित्तें परियेसा ॥ ४३९ ॥
‘ तं ‘ नमः शिखा विन्यस्य । ‘ यां ‘ नमः मूर्ध्नि विन्यस्य ।
‘ दं ‘ नमः उत्तरमुखाय विन्यस्य । ‘ चों ‘ नमः पश्र्चिममुखाय ॥ ४४० ॥
प्रं ‘ नमः दक्षिणमुखाय । ‘ नं ‘ नमः प्राङ् मुखाय ।
‘ यों ‘ नमः ललाटे । ‘ यों ‘ नमः भ्रुवोर्मध्ये ॥ ४४१ ॥
‘ धिं ‘ नमः नेत्रत्रये । ‘ हिं ‘ नमः नासिकायां ।
‘ मं ‘ नमः तालौ । ‘ धीं ‘ नमः दंतेषु ॥ ४४२ ॥
‘ स्यं ‘ नमः कंठे । ‘ वं ‘ नमः हृदये ।
‘ दें ‘ नमः स्तनयोः । ‘ र्गो ‘ नमः उदरे ॥ ४४३ ॥
प्रणवादि–नमोऽन्त न्यास करावे । अ–कार नाभौ, उ–कार हृदये ।
म–कार मुखे, न– कार ललाटे । म–कार शिरसि, मुद्रा हस्तेन नमस्कृत्वा ॥ ४४४ ॥
अथ मुद्रासंपुटप्रकारीं । चतुर्विशति अवधारीं ।
सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्तें ॥ ४४५ ॥
‘ सुमुख ‘ प्रथम, ‘ संपुट ‘ दुसरा । ‘ वितत ‘ –‘ विस्तृत ‘ चतुर्थ धरा ।
‘ द्विमुखी ‘ ‘ त्रिमुखी, ‘ –चतुर्मुखी ‘ करा । ‘ पंच ‘ –षण्मुखी ‘ देखा ॥ ४४६ ॥
‘ अधोमुखी ‘ –व्यापकांजलिका । ‘ शकट ‘ ‘ यमपाश ‘ ऐका ।
‘ ग्रंथित ‘ –‘ संमुखोन्मुखा ‘ । ‘ प्रलंब ‘ –‘ मुष्टि ‘ मुद्रा ॥ ४४७ ॥
‘ मत्स्य ‘ –‘ कूर्म ‘–‘ वराह ‘ । ‘ सिंहाक्रांति ‘ ‘ महाक्रांती ‘ ‘ मुग्दर ‘ ख्याति ।
‘ पल्लव ‘ नाम मुद्रा असती । चव्वीस मुद्रा यरणेंपरी ॥ ४४८ ॥
मुद्राविणें गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ ।
याकारणें करावा पवित्र । मुद्रापूर्वक परियेसा ॥ ४४९ ॥
गौप्य करावा मुद्राजप । शिष्यें देखिलिया नाहीं पाप ।
गुरु–पुत्रापुढें अथवा बाप । पाहिलिया दोष नाही ॥ ४५० ॥
इतुके न्यास करोनि । प्राणायाम करा तीनि ।
‘ समस्तपापक्षयार्थ ‘ म्हणोनि । अष्टोत्तरशत संकल्पावें ॥ ४५१ ॥
गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ‘ ऋग्वेद ‘ –ऋषि ।
‘ भूमि ‘ तत्त्व परियेसीं । ‘ ब्रह्मा ‘ दैवत जाणावें ॥ ४५२ ॥
‘ गायत्री ‘ नाम छंदासी । म्हणावें प्रथम पादासी ।
आतां द्वितीय पादासी । विधान ऐका सांगेन ॥ ४५३ ॥
द्वितीय पाद गायत्रीसी । ‘ यजुर्वेद ‘ असे ऋषि ।
‘ ऋक्साम ‘ तत्त्व परियेसीं । ‘ रुद्रो ‘ देवता , ‘ त्रिष्टुप् ‘ –छंदः ॥ ४५४ ॥
तृतीय पाद गायत्रीसी । ‘ सामवेद ‘ असे ऋषि ।
‘ प्राणापान-व्यान ‘ ऐशी । समान तत्त्व परियेसा ॥ ४५५ ॥
‘ विष्णु ‘ देवता , छंद– ‘ जगती ‘ । जाणावें तुम्ही एकचित्तीं ।
‘ समस्तपापक्षयार्थे । जपे विनियोगः ‘ म्हणावें ॥ ४५६ ॥
गायत्रीचें ध्यान । सांगेन तुम्हां विधान ।
एकचित्तें करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४५७ ॥
(श्र्लोक) मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।
गायत्रीं वरदाभयांकुशकशां शूलं कपालं गुणं शंखं चक्रमथारविंदयुगलं हस्तैर्वहतीं भजे ॥ ४५८ ॥
ऐसें ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्र-नयनीं ।
अंती षडंग न्यासोनि । जप करावा विसर्जन ॥ ४५९ ॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्तें परियेसा ।
नाम ‘ मंत्र ‘ असे विशेषा । अक्षरें दोनी पाप हरे ॥ ४६० ॥
मन्-कार म्हणजे आपुलें मन । त्र–कार नाम आपुला प्राण ।
मन–प्राण एकवटोन । जप करावा एकचित्तें ॥ ४६१ ॥
‘ जप ‘ म्हणजे अक्षरें दोनी । प्रख्यात असतीं त्रिभुवनीं ।
ज–कार जन्म विच्छेदोनि । प–कारें जन्मपाप दुरी ॥ ४६२ ॥
चारी वेदांसी मूळ एक । गायत्रीमंत्र असे ऐक ।
याचि कारणें जपावा निक । वेदपठणफळ असे ॥ ४६३ ॥
ऐसा मंत्र न जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर ।
जप करा हो निर्धार । चिंतिले फळ पाविजे ॥ ४६४ ॥
न करावा उदकीं बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन ।
सांगेन त्याचें कारण । अग्नि तीन विप्रमुखीं ॥ ४६५ ॥
‘ आहवनीय ‘ ‘ गार्हपत्य ‘ । ‘ दक्षिणाग्नि ‘ तिसरा विख्यात ।
आग्नि-उदक-संपर्क होतां । तेजत्व जाय अग्नीचें ॥ ४६६ ॥
उदक वर्जावें याकारण । बैसिजे आपण शुभासन ।
हस्त स्पर्शोनि नाभिस्थानीं । प्रातःकाळीं जपावा ॥ ४६७ ॥
माध्याह्नीं हृदयस्थानीं । जपावा माळा धरोनि ।
हस्त मुखें स्पर्शोनि । सायंकाळीं जपावा ॥ ४६८ ॥
उभेनि जपावा प्रातःकाळीं । बैसोन कीजे माध्याह्नकाळीं ।
अथवा उभा राहोनि निश्र्चळीं । उभय पक्षीं करावा ॥ ४६९ ॥
बैसोन जपावा सायंकाळीं । पहावा वृक्ष मननिर्मळी ।
जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्र नयनीं जपावा ॥ ४७० ॥
ब्रह्मचारी-गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी ।
वानप्रस्थ-यतीश्र्वरासी । सहस्त्र मुख्य करावा ॥ ४७१ ॥
संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति करा पुरी ।
अशक्य होय जरी । दहा वेळ जपावा ॥ ४७२ ॥
उत्तम पक्ष करा मानसीं । मध्यम मुखें गौप्येंसी ।
प्रगट वाक्याक्षरासी । कनिष्ठ प्रकार परियेसा ॥ ४७३ ॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसीं ।
म्हणतां पातक महादोषी । महानरक अवधारा ॥ ४७४ ॥
तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात् ॥ १ ॥
पृथक करोनि त्रिपादासी । जपा मंत्र अतिहर्षी ।
पापें जातीं ब्रह्महत्या दोषीं । अनंत पुण्य पाविजे ॥ ४७५ ॥
अगुळीजपें एक पुण्य । पर्वांगुलीनें दशगुण ।
शंखमणीनें होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥ ४७६ ॥
स्फटिकें दहासहस्त्र पुण्य । मौक्तिकें लक्ष गुण जाण ।
पद्माक्षीं जप निर्गुण । दशलक्ष पुण्य असे ॥ ४७७ ॥
कोटिगुणें सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला ।
जप करा तुम्ही निश्र्चळा । गौप्यमाला धरोनियां ॥ ४७८ ॥
जप करितां नुल्लंघिजे मेरु । पाप बोलजे अपारु ।
प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरु लंघिले पाप जाय ॥ ४७९ ॥
गायत्रीजप तीन पादास । प्रत्यहीं करावा एकादश ।
पापांचा होय सर्व नाश । त्रिरात्रीचें पाप जाय ॥ ४८० ॥
अष्टोत्तरशत जप करितां । अमोघ पातक जाय त्वरिता ।
करावा सहस्त्र एकचित्ता । उपपातकें नासतीं ॥ ४८१ ॥
महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसीं ।
जी जी कामना इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥ ४८२ ॥
द्रव्य घेवोनि एकापाशी । जप करितां अनंतदोषी ।
चांडालयोनीं भरंवसीं । जन्म पावे परियेसा ॥ ४८३ ॥
जप करावा मनदृढें । न पहावें मागे पुढें ।
शूद्रादिक जातीकडे । संभाषणादि करुं नये ॥ ४८४ ॥
कंडूं नये देह आपुलें । नेणतां जरी इतुकें घडलें ।
श्रोत्राचमन करा वहिलें । दोष नाहीं अवधारा ॥ ४८५ ॥
ब्राह्मणाचे दक्षिणकाना । सप्तदेवता आहेति जाणा ।
स्पर्श करितां तत्क्षणा । पापें जातीं परियेसा ॥ ४८६ ॥
दृष्टीं पडतां चांडाळयाती । द्विराचमनें होय शुद्धती ।
संभाषण होय पतिताप्रति । स्नान करावें परियेसा ॥ ४८७ ॥
मौन्य करावें हें उत्तम । अगत्य बोलिजे संधिविषम ।
‘ तद्विष्णो–‘ । मंत्र जपता कर्मी । पापें जातीं सकळिक ॥ ४८८ ॥
जपतां निद्रा येई जरी । अघोवायु जांभई आली तरी ।
क्रोधरुप जपतां भारी । पापें घडतीं अवधारा ॥ ४८९ ॥
नेणतां घडे इतुकें जरी । आचमन करावें श्रोत्रीं ।
अग्नि सूर्यधेनुदर्शन करीं । विष्णुमंत्र जपावा ॥ ४९० ॥
ऐसा जप करावा विधीनें । मनकामना होय पूर्ण ।
ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥ ४९१ ॥
गायत्री जप करा ऐसा । प्रातःकाळी म्हणा ‘ मित्रस्य ‘ ।
‘ उदुत्यं ‘ मंत्र माध्याह्नेसी । ‘ इमं मे वरुण ‘ सायंकाळी ॥ ४९२ ॥
शाखापरत्वें मंत्र असती । म्हणा जैसे विधि असती ।
गोत्र-प्रवर उच्चारा भवतीं । वृद्धाचाराप्रमाणें ॥ ४९३ ॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी ।
गोत्र-प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥ ४९४ ॥
ऐसी संध्या करुन । मग करावें औपासन ।
सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४९५ ॥
सायंप्रातेर्वेळा दोन्ही । औपासन करावें सगुणीं ।
मिळोनि न करावें विद्वज्जनीं । करावें सर्वीं द्विकाळ मुख्य ॥ ४९६ ॥
न करावें वेळणी अळंद्यांत । भूमीवरी न करा नित्य ।
स्यंडिलीं करावें विहित । अथवा उदकें सारवावें ॥ ४९७ ॥
कुंडीं स्थापोनि अग्नीसी । करावें नित्य औपासनासी ।
वारा घालो नये त्यासी । हातें-पर्णें-मुखें-सुपें ॥ ४९८ ॥
व्याधिष्ठ होय पर्णवायें । सुपें दरिद्र धनक्षय ।
मुखें फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूळीं होय मृत्यु ॥ ४९९ ॥
फुंकणी अथवा विंझणेसीं । वायु घालावा अग्नीसी ।
काष्ठें समृद्धि परियेसीं । ज्वलित असावा अग्नि देखा ॥ ५०० ॥
ज्वाला निघती जये स्थानीं । आहुती घालावी तिये वदनी ।
समिधा आणाव्या ब्राह्मणीं । शूद्रहस्तें घेऊं नये ॥ ५०१ ॥
समिधा पुष्पें दूर्वा देखा । आणों नये शूद्रें ऐका ।
होमद्रव्यें आहेति विशेखा । सांगेन नांवें परियेसा ॥ ५०२ ॥
साळी सांवे नीवार–। तंदुळ असती मनोहर ।
गोधूम जव निर्धार । यावनाळ राळे मुख्य असती ॥ ५०३ ॥
साठीं दाणे मिति प्रंमाण । आहुति मुख्य कारण ।
अधिक अथवा न करा उणे । घृतसंपर्क करावें ॥ ५०४ ॥
घृत नसेल समयासी । तिळ पवित्र होमासी ।
तिळांचें तैल परियेसीं । तेंही पवित्र असे देखा ॥ ५०५ ॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ करावा तर्पण परी ।
सांगेन विधि परिकरीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ५०६ ॥
मुख्य सकळीं माध्याह्नीं । स्नान-संध्या-जपादि करोनि ।
औपासनादि करा विधानीं । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥ ५०७ ॥
उदकसमीप मुख्य स्थान । करा तर्पण ब्रह्मयज्ञ ।
प्राणायाम तीन करोन । ‘ विद्युदसि ‘ मंत्र जपावा ॥ ५०८ ॥
दूर्वा घेऊन दक्षिण करीं । उदयमुख अथवा उत्तरीं ।
बसावें वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥ ५०९ ॥
उभयहस्तसंपुटेंसी । ठेवावे दक्षिण जानूसी ।
म्हणावें तीन प्रणवांसी । मग म्हणावें ऋचाक्षर ॥ ५१० ॥
‘ ओं भूर्भुवः स्वः ‘ ऐसें म्हणोनि । ‘ तत्सवितुर्वरेण्यीं ‘ ।
त्रिपदा गायत्री उच्चारोनि । मग जपावी दहा वेळां ॥ ५११ ॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसीं ।
अनध्याय होय तया दिवसीं । एक ऋचा म्हणावी ॥ ५१२ ॥
तेही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषीं ।
‘ नमो ब्रह्मणे ‘ मंत्रासी । तीन वेळ जपावें ॥ ५१३ ॥
‘ वृष्टिरसि ‘ मंत्रासी । जपोनि स्पर्शावें उदकासी ।
तर्पण करावें परियेसीं । ऐक ब्राह्मणा एकचित्तें ॥ ५१४ ॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । दर्भ मुख्य परियेसीं ।
वसु-रुद्र-आदित्येसीं । तृप्त समस्त देव-पितर ॥ ५१५ ॥
एखादे दिवसीं न घडे जरी । अथवा होय समय रात्री ।
जप करावा गायत्री । वेदपठण फळ असे ॥ ५१६ ॥
देवतर्पण कुशाग्रेसीं । मध्य-स्थानें तृप्त ऋषि ।
मूळाग्रीं पितृवर्गासी । तर्पण करावें परियेसा ॥ ५१७ ॥
न करावें तर्पण पात्रांत । करावें आपण उदकांत ।
भूमीवरी घरीं नित्य । निषिद्ध असें करुं नये ॥ ५१८ ॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करा अवधारीं ।
विधियुक्त भक्तिपुरःसरीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ५१९ ॥
तीळ धरोन आपुल्या करीं । तर्पण करावें अवधारीं ।
ठेवों नये शिळेवरी । भूमीं काष्ठपात्रीं देखा ॥ ५२० ॥
रोमकूपादि स्थानीं देखा । तीळ ठेवितां पावती दुःखा ।
तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोललीं स्थानें पांच ॥ ५२१ ॥
घरीं तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसीं ।
करावें आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥ ५२२ ॥
श्र्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी ।
कृष्णवर्ण पितरांसी । तिळतर्पण करावें ॥ ५२३ ॥
यज्ञोपवीत सव्यें देवांसी । निवीतीनें करावें ऋषीसी ।
अपसव्यें पितरांसी । तर्पण करावें येणें रीतीं ॥ ५२४ ॥
देवांसी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक् ।
पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसें करावें ॥ ५२५ ॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त माता-बंधूसी ऐका ।
सापत्नी-आचार्य नामिका । द्वयांजुलि करावें ॥ ५२६ ॥
देवब्रह्मऋषीश्र्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी ।
कृष्ण तील पितरांसी । अनंतपुण्य परियेसा ॥ ५२७ ॥
आदित्य-शुक्रवारेंसी । प्रतिपदा मघा-नक्षत्रासी ।
षष्ठी-नवमी-एकादशींसी । तिलतर्पण करुं नये ॥ ५२८ ॥
अथवा विवाह-उपनयनासी । जन्मनक्षत्र-जन्मदिवशीं ।
आपुल्या घरीं शुभदिवसीं । तिलतर्पण करुं नये ॥ ५२९ ॥
जघीं न करी तिलतर्पण । उदकें मुख्य करा जाण ।
मुद्रिका हस्तीं असे सुवर्ण । दर्भपवित्रीं करावें ॥ ५३० ॥
पाय न धुतां मंगळस्नान । तिलावीण करितां तर्पण ।
श्राद्ध करी दक्षिणेवीण । निष्फल असे अवधारीं ॥ ५३१ ॥
निषिद्ध बोलिलें ज्या दिवसीं । तर्पण करावें उदकेसीं ।
दिपवाळी चतुर्दशीसी । करावें तर्पण परियेसा ॥ ५३२ ॥
अंगारक कृष्ण चतुर्दशी । यमाचे नांवें विधीसीं ।
करावें तर्पण परियेसीं । यज्ञोपवीत सव्यानें ॥ ५३३ ॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि ।
यमाचें नां उच्चारोनि । तर्पण करावें भक्तीनें ॥ ५३४ ॥
यमाचीं नांवें चतुर्दशी । सांगेन ऐका विस्तारेसीं ।
यम-धर्मराजनामें ऐसीं । मृत्यु-अंतक चौथा जाणा ॥ ५३५ ॥
वैवस्वत-काल देखा । सर्वभूतक्षय ऐका ।
आठवा औदुंबर-दघ्न निका । नीलाय परमेष्ठी एकादश ॥ ५३६ ॥
वृकोदर-चित्र देखा । चित्रगुप्त-चतुर्दशका ।
पृथक् नामें म्हणोनि एकेका । नदींत द्यावें परियेसा ॥ ५३७ ॥
समस्त पातकें नासतीं । रोगव्याधि न पीडिती ।
न घडे कधीं अपमृत्यु । शनैश्र्वरादि महापीडा ॥ ५३८ ॥
शुक्लपक्षीं माघमासीं । तर्पण करावें अष्टमीसी ।
भीष्मनामें परियेसीं । वर्षपातकें परिहार होतीं ॥ ५३९ ॥
ऐसें तर्पण करोनि । सूर्यनामें अर्घ्यें तीनी ।
द्यावी समस्त विद्वजनीं । म्हणे श्रीनृसिंहसरस्वती ॥ ५४० ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति श्रीगुरु ऐसी ।
सांगते झाले ब्राह्मणासी । कर्ममार्ग येणेंपरी ॥ ५४१ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधर । ऐसा ब्राह्मणाचा आचार ।
वर्ततां होय मनोहर । सर्वाभीष्टें साधतीं ॥ ५४२ ॥
॥ इति श्रीगुरुचरितामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
आह्निकनिरुपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥