गुरुचरित्र अध्याय 9 में बताया गया है कि कैसे गुरु के ज्ञान से मुक्ति का मार्ग प्राप्त होता है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनका ज्ञान प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु का ज्ञान हमें मोक्ष प्राप्त करने में मदद करता है और हमें जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति दिलाता है। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक राजा को गुरु के ज्ञान से मुक्ति का मार्ग प्राप्त होता है। राजा बहुत धनी और शक्तिशाली था, लेकिन वह अपने जीवन में सुखी नहीं था। वह हमेशा मोक्ष पाने की इच्छा रखता था। एक दिन, राजा गुरु से मिला और उनसे मोक्ष प्राप्त करने का मार्ग पूछा। गुरु ने राजा को ज्ञान दिया और उसे मोक्ष का मार्ग बताया। राजा ने गुरु के ज्ञान को आत्मसात किया और मोक्ष प्राप्त कर लिया।
॥ श्रीगणेशाय नमः ॥
॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरुनियां ॥ १ ॥
श्रीपादराव कुरवपुरीं असतां । पुढें वर्तली कैसी कथा ।
विस्तारुन सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ २ ॥
भक्तवत्सल श्रीगुरुराव । जाणोनि शिष्याचा भाव ।
विस्तार करोनि भक्तिस्तव । निरोपिलें श्रीगुरुचरित्र ॥ ३ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढे जाहले अति कवतुका ।
तया ग्रामी रजक एका । सेवक झाला श्रीगुरुचा ॥ ४ ॥
नित्य श्रीपाद गंगेसी येती । विधिपूर्वक स्नान करिती ।
लौकिकवेव्हार दिव्यगति । आचरती त्रैमूर्ति आपण ॥ ५ ॥
ज्याच्या दर्शनें गंगास्नान । त्यासी काय असे आचरण ।
लोकानुग्रहाकारण । स्नान करिती परियेसा ॥ ६ ॥
वर्ततां ऐसे एके दिवशीं । श्रीपाद येती स्नानासी ।
गंगा वाहे दाही दिशीं । मध्यें असती आपण देखा ॥ ७ ॥
तया गंगा तटाकांत । रजक असे वस्त्रें धूत ।
नित्य येऊनि असे नमित । श्रीपादगुरुमूर्तीसी ॥ ८ ॥
नित्य त्रिकाळ येऊनियां । दंडप्रणाम करुनियां ।
नमन करी अतिविनया । मनोवाक्कायकर्मेसी ॥ ९ ॥
वर्तातां ऐसे एके दिवशीं । आला रजक नमस्कारासी ।
श्रीपाद म्हणती तयासी । एकचित्ते परियेसा ॥ १० ॥
श्रीपाद म्हणती रजकासी । कां रे नित्य कष्टतोसी ।
तुष्टलो मी तुझे भक्तीसी । सुखे राज्य करी म्हणती ॥ ११ ॥
ऐकतां श्रीगुरुचें वचन । गाठी पालवीं बांधी शकुन ।
विनवितसे कर जोडून । सत्यसंकल्प श्रीगुरुमूर्ति ॥ १२ ॥
रजक सांडी संसारभ्रांत । सेवक जाहला एकांतभक्त ।
दुरुनि करी दंडवत । मठा गेलिया येणेचिपरी ॥ १३ ॥
ऐसे बहुत दिवसांवरी । रजक मग सेवा करी ।
आंगण झाडी प्रोक्षणें करी । नित्य नेम येणे विधीं ॥ १४ ॥
असतां एके दिवसी देखा । वसंतमास वैशाखा ।
क्रीडा करीत नदीतून निका । आला राजा म्लेंछ एक ॥ १५ ॥
स्त्रियांसहित नावेंत आपण । अळंकृत आभरण ।
क्रीडा करीत स्त्रियांसह आपण । गंगेमधून येतसे ॥ १६ ॥
सर्व दळ थडिये थडी । अमित असती हस्ती घोडी ।
मिरवीताति रत्नें क्रोडी । अळंकृत सेवकजन ॥ १७ ॥
ऐसा गंगाप्रवाहांत । राजा आला खेळत ।
नाना वाद्ये असे गर्जत । सवे येती थडियेसी ॥ १८ ॥
रजक होता नमस्कारित । शब्दे झाला अति दुश्र्चित ।
असे गंगेंत अवलोकित । समारंभ राजयाचा ॥ १९ ॥
विस्मय करी अति मानसीं । मी जन्मोनियां संसारासी ।
न देखिलें सौख्यासी । पशुसमान देह आपुला ॥ २० ॥
धन्य राजयाचे जिणें । ऐसे सौख्य भोगणे ।
स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे । कैसा हा भक्त ईश्र्वराचा ॥ २१ ॥
कैसें याचे आर्जव-फळ । कवण देव आराधिला ।
कैसा गुरु असें भेटला । मग पावला हें पद ॥ २२ ॥
ऐसें मनी चिंतित । करीतसे दंडवत ।
श्रीगुरु श्रीपाद कृपावंत । वळखिली त्याची मनवासना ॥ २३ ॥
भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ति । ओळखोनि तयाची स्थिति ।
बोलावूनियां पुसती । काय चिंतितोसि मनांत ॥ २४ ॥
रजक म्हणे स्वामियासी । देखिले दृष्टीने रायासी ।
संतोष जाहला मानसी । केवळ दास श्रीगुरुचा ॥ २५ ॥
तपें आराधोनि देवासी । पावला ऐशा अवस्थेसी ।
म्हणोनि चिंतितों मानसीं । कृपामूर्ति दातारा ॥ २६ ॥
ऐसे अविद्यासंबंधेसी । नाना वासना इंद्रियांसी ।
चाड नाहीं या भोगासी । चरणीं तुझे सौख्य माझे ॥ २७ ॥
श्रीपाद म्हणती रजकासी । जन्मादारभ्य कष्टलासी ।
वांछा असे भोगावयासी । राज्यपद तमोवृत्ती ॥ २८ ॥
निववावी इंद्रियें सकळ । नातरी नव्हे मन निर्मळ ।
बाधा करिती पुढे केवळ । जन्मांतरीं परियेसीं ॥ २९ ॥
तुष्टवावया इंद्रियांसी । तुवां जन्मावें म्लेंछवंशी ।
आवडी जाहली तुझे मानसीं । राज्य भोगीं जाय त्वरित ॥ ३० ॥
ऐकोनि स्वामीचे वचन । विनवी रजक कर जोडून ।
कृपासागर श्रीगुरुराणा । उपेक्षूं नको म्हणतसे ॥ ३१ ॥
अंतरतील तुझे चरण । द्यावें माते पुनर्दर्शन ।
तुझा अनुग्रह असे कारण । ज्ञान द्यावें दातारा ॥ ३२ ॥
श्री गुरु म्हणती तयासी । वैदुरानगरीं जन्म होसी ।
भेटी देऊं अंतकाळासी । कारण असे आम्हां येणे ॥ ३३ ॥
भेटी होतांचि आम्हांसी । ज्ञान होईल तुझे मानसीं ।
न करी चिंता हो, भरंवसी । आम्हां येणे घडेल ॥ ३४ ॥
आणिक कार्याकारणेसी । अवतार होऊं परियेसीं ।
वेष धरुनि संन्यासी । नाम ‘ नृसिंहसरस्वती ‘ ॥ ३५ ॥
ऐसे तया संबोखूनि । निरोप देती जाई म्हणोनि ।
रजक लय लावोनि चरणीं । नमन करीतसे तया वेळीं ॥ ३६ ॥
देखोनि श्रीगुरु कृपामूर्ति । रजकासी जवळी पाचारिती ।
इह भोगिसी किंवा पुढतीं । राज्यभोग सांग मज ॥ ३७ ॥
रजक विनवीत श्रीपादासी । झालों आपण अपरवयासी ।
भोग भोगीन बाळाभ्यासी । यौवनी गोड राज्यभोग ॥ ३८ ॥
ऐकोनि रजकाचे वचन । निरोप देती श्रीपाद आपण ।
त्वरित जाई रे म्हणोन । जन्मांतरीं भोगी म्हणती ॥ ३९ ॥
निरोप देतांचि तये वेळीं । त्यजिला प्राण तत्काळीं ।
जन्म झाला म्लेंछकुळी । वैदुरानगरी प्रख्यात ॥ ४० ॥
ऐसी रजकाची कथा । पुढें सांगेन विस्तारता ।
सिद्ध म्हणे नामधारकातें । चरित्र झाले पुढें आणिक ॥ ४१ ॥
इतुके झालिया अवसरीं । श्रीपादराव कुरवपुरीं ।
असतां महिमा अपरांपरी । प्रख्यात जाहली परियेसा ॥ ४२ ॥
महिमा सकळ सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
पुढील आवतार असे ख्याता । सांगेन ऐक नामधारका ॥ ४३ ॥
महिमान सांगतां श्रीगुरुंचे । शक्ति कैची आमुचे वाचे ।
नवल नव्हे अमृतदृष्टीचें । स्थानमहिमा ऐसाचि असे ॥ ४४ ॥
श्रीगुरु राहती जया स्थानीं । महिमा अपार तया भुवनीं ।
विचित्र असे आख्यायनी । दृष्टांत तुज सांगेन ॥ ४५ ॥
स्थानमहिमेचा विस्तार । सांगेन ऐक मनें एकाग्र ।
प्रख्यात असे कुरवपुर । मनकामना पुरती तेथें ॥ ४६ ॥
ऐसे किती दिवसवरी । श्रीपाद होते कुरवपुरीं ।
कारण असे पुढें अवतारीं । म्हणोनि अदृश्य होती तेथेंचि ॥ ४७ ॥
आश्र्विन वद्य द्वादशी । नक्षत्र मघा, मृगराज राशी ।
श्रीपाद बैसले निजानंदेसीं । अदृश्य झाले गंगेंत ॥ ४८ ॥
लौकिकी दिसती अदृश्य आपण । कुरवपुरी असती जाण ।
श्रीपादराव निर्धारी जाण । त्रयमूर्तीचा अवतार ॥ ४९ ॥
अदृश्य होवोनि तया स्थानीं । श्रीपाद राहिले निर्गुणीं ।
अवतार व्हावया पुढें कारणी । म्हणोनि कवणा न दिसती ॥ ५० ॥
जे जन असती भक्त केवळ । त्यांसी दिसती निर्मळ ।
कुरवक्षेत्र अतिर्बळ । असे प्रख्यात भूमंडळीं ॥ ५१ ॥
श्रीपाद आहेत तया स्थानीं । दृष्टांत सांगेन विस्तारुनि ।
ऐका श्रोते सकळ जन । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ ५२ ॥
सिद्धे सांगितले नामधारकासी । तेचि कथा विस्तारेसीं ।
सांगतसे सकळिकांसी । गंगाधराचा आत्मज ॥ ५३ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे रजकवरप्रदानं
तथा श्रीपादनिजानंदगमनं नाम नवमोध्यायः ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु । श्रीगुरुदेवदत्त ॥